Fruits Rate: नवरात्रीच्या उपवासामुळे फळ बाजार हालला; सफरचंद ते केळी सध्याचे पुण्यातील दर काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Fruits Rate: नवरात्री उत्सवामुळे फळांची मागणी वाढली आहे. पुण्यात फळांच्या दरात 20 टक्क्यांनी वाढली असून फळांचे सध्याचे दर जाणून घेऊ.
पुणे: सध्या नवरात्रौत्सव सुरू असून अनेक जण नवरात्रीचे उपवास करतात. या उपवासादरम्यान फलाहार करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि फळांच्या दरांत वाढ होते. या काळात फळांची उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सध्याचे फळांचे बाजार भाव काय आहेत? याबद्दल फळ विक्रेते नवीन शेख यांनी माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून याचा परिणाम फळांच्या दरांवरही झाला आहे. फळांची आवक कमी झाली आहे आणि मागणी वाढल्यामुळे फळांच्या भावात वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड मार्केटमध्ये फळांच्या भावात नवरात्र सुरू झाल्यापासून 10 ते 20 टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
नवीन शेख यांनी सांगितले की, सफरचंदाचे दर पूर्वीचे 100 रुपये किलोवरून आता 120 ते 130 रुपये किलो इतके झाले आहेत. डाळिंबाचे भावही वाढले असून पूर्वी 80 ते 90 रुपये किलो मिळणारे डाळिंब आता 110 ते 120 रुपये किलोने विकले जात आहे. मात्र सीताफळ आणि मोसंबी यांच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. सीताफळ 30 ते 40 रुपये किलो तर मोसंबी 30 ते 40 रुपये किलो इतक्याच दराने विकली जात आहे. त्यामुळे या दोन फळांमध्ये ग्राहकांना थोडा दिलासा मिळत आहे. घाऊक बाजारात केळी 50 ते 60 रुपये डझन दराने मिळत असून पेरू 40 ते 50 रुपये किलो दराने विक्री होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दरवर्षी नवरात्रात मागणी वाढल्याने दर वाढतात.
advertisement
नवरात्रीनंतर फळांच्या भावात घट होण्याची शक्यता
नवीन शेख यांनी सांगितल्यानुसार, नवरात्री उत्सव संपल्यानंतर फळांच्या भावात घट होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, नवरात्रीनंतर फळांचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी कमी होऊ शकतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 27, 2025 1:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Fruits Rate: नवरात्रीच्या उपवासामुळे फळ बाजार हालला; सफरचंद ते केळी सध्याचे पुण्यातील दर काय?