सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात घडलेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टात लेखणी बंद निदर्शने आंदोलन पुकारण्यात आले होते.या आंदोलनात असंख्य वकील सहभागी झाले होते. पण सरकारी अॅडवोकेट जी पी देशपांडे यांनी काम चालू ठेवले होते आणि निषेधाचा लोगो देखील लावला नव्हता.या घटनेची माहिती अॅडवोकेट महादेव लोखंडे यांना कळताच त्यांनी अॅडवोकेट जी पी देशपांडे यांच्या चेंबरमध्ये घूसून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासोबत त्यांच्यावर बूट फेकून मारला.ही घटना जिल्हा न्यायालयात साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली होती. या घटने संदर्भात वेदांत नगर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.
advertisement
प्रकरण काय?
सुप्रीम कोर्टाच्या सु्नावणी दरम्यान राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीर बीआर गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या घटनेवर बी.आर.गवई यांनी संबंधित वकिलावर कोणतीही कारवाई करण्याचे आदेश दिले नव्हते.या उलट त्यांनी या सर्व गोष्टीमुळे विचलित होण्याची गरज नाही.अशा गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही,असे त्यांनी सांगितले होते.
तर या घटनेवर हल्ला करणारे वकील राकेश किशोर म्हणाले होते की, मला या कृत्याचा पश्चाताप नाही.आपण तुरुंगवासही भोगण्यास तयार आहोत. तसेच दैवी शक्तीमुळे हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले होते.