माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराजे पवार आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज पंडित दोघांमध्ये मारहाण झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. पोलिसांनी जमावावर लाठीमार करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. बीडच्या गौराई मतदानाला हिंसक वळण आल्यानं परिसरात खळबळ उडाली असून, काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
advertisement
नेमकं काय घडलं?
माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराजे पवार आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज पंडित दोघांमध्ये मारहाण झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले.
लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न : अमरसिंह पंडित
अमरसिंह पंडित म्हणाले, ही निवडणूक चालू असताना विरोधकांकडून अशी घटना घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वीच माहित होतं. दहशत माजवण्याचं काम ते करणार हे मला माहीत होतं. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न होता. सकाळच्या घटनेनंतर शांततेत मतदान सुरू आहे. कोणाच्याही दहशतीला कोणी बळी पडू नये. माझे स्विय्य सहाय्यक यांच्याशी हातापायी झाली आहे.
तक्रारी संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ : अमरसिंह पंडित
या घटनेत जखमी कोणी आहे का याबाबतची मी माहिती घेणार आहे. मोठ्या संख्येने लोकांनी मतदान करावे. पवार कुटुंबाने घडवून आणलं आहे. पोलीस अधिक्षकांनी सांगितले तुम्ही शांतता ठेवा. सध्या मतदान महत्त्वाचं आहे, तक्रारी संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊया, असे अमरसिंह पंडित म्हणाले.
हे ही वाचा :
