नाशिक : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे आज भाजपात प्रवेश करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. सुजाता डेरे यांच्या या निर्णयामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
advertisement
एबी फॉर्म मिळूनही घेतली माघार
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजाता डेरे यांनी नाशिकमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मनसेकडून अधिकृत एबी फॉर्म मिळूनही त्यांनी ऐनवेळी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
मनसेकडून कुणाला संधी?
दरम्यान, मनसेने नाशिकमधील विविध प्रभागांमध्ये आपले उमेदवार जाहीर करून निवडणुकीसाठी तयारी पूर्ण केल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील ड आरक्षणातून कोंबडे सुदाम विश्राम यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग १ अ मधून गांगुर्डे प्रिया बाळकृष्ण, तर प्रभाग ३ ब मधून मंडलिक शितल विपुल आणि त्याच प्रभागातील ड आरक्षणातून भवर संदीप सुभाष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्रभाग ४ मध्ये ब आरक्षणातून दौदे निकिता सागर आणि ड आरक्षणातून कुलकर्णी कविता हर्षल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रभाग ५ ड मधून जाधव नवनाथ जिवराम, प्रभाग ७ अ मधून खंडाळे सत्यम चंद्रकांत, तर प्रभाग ८ मध्ये क आरक्षणातून कोरडे भाग्यश्री संतोष आणि ड-ब आरक्षणातून गुंबाडे विशाल सुरेश यांना संधी मिळाली आहे. प्रभाग १० मध्ये ब आरक्षणातून जाधव किरण नामदेव आणि ड आरक्षणातून शेख फरीदा सलीम हे मनसेचे उमेदवार असतील.
याशिवाय प्रभाग ११ अ मधून भावले विशाल संपत, क आरक्षणातून काळे माया आणि जाधव गीता संजय, प्रभाग १२ अ मधून तेजाळे किशोर विनायक, प्रभाग १३ ब मधून पवार मयुरी अंकुश, तर प्रभाग १६ क मधून सहाणे मिरा बाळासाहेब यांना पक्षाने संधी दिली आहे. प्रभाग १८ ब मधून पिल्ले रोहिणी संतोष आणि प्रभाग २३ ड मधून उपासनी स्वागता रमेश यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
प्रभाग २४ मध्ये ब-ड आरक्षणातून जगताप तुषार पुंडलिक, क आरक्षणातून रोजेकर सावित्री भिकन आणि दौदे संदीप गोपीचंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग २५ मध्ये ड-ब आरक्षणातून पाटील राहुल सुदाम, प्रभाग २६ क मधून पवार निर्मला भास्कर व बगडे अर्चना ज्ञानेश्वर, तर प्रभाग २७ मध्ये अ आरक्षणातून मोकळ शैला दीपक, क मधून खाडम किरण गंगाराम आणि ब मधून कोदे श्री सुधाकर तसेच वेताळ वर्षा अरुण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग २९ मधील ड आरक्षणातून माळी नितीन जगन्नाथ यांना संधी देण्यात आली आहे.
