TRENDING:

नाशिक महापौरपदाआधीच स्थायी समितीचा फॉर्म्युला ठरला? कुणाला किती जागा मिळणार? अपडेट आली समोर

Last Updated:

Nashik Election 2026 :  महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट कौल मिळवत भाजपने नाशिक महापालिकेवर सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट कौल मिळवत भाजपने नाशिक महापालिकेवर सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता स्थापन केली आहे. या निकालानंतर केवळ महापौरपदच नव्हे, तर महापालिकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांचा कणा असलेल्या स्थायी समितीवरही भाजपचे पूर्ण वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील पाच वर्षे शहराच्या कारभाराची सूत्रे भाजपकडे राहणार असून, विरोधकांकडे मर्यादित भूमिका उरणार आहे.
nashik election 2026
nashik election 2026
advertisement

भाजपचा स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय

नाशिक महापालिकेच्या १२२ जागांपैकी भाजपने तब्बल ७२ जागा जिंकत बहुमताचा आकडा मोठ्या फरकाने पार केला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ६२ जागांपेक्षा भाजपकडे दहा नगरसेवक अधिक असल्याने सत्तास्थापनेबाबत कोणतीही शंका उरलेली नाही. या संख्याबळामुळे महापौरपद भाजपकडे जाणे जवळपास निश्चित झाले आहे.

स्थायी समितीवरही भाजपचे वर्चस्व

महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्थायी समितीत एकूण १९ सदस्य असतात. नगरसेवक संख्येनुसार ठरवण्यात येणाऱ्या कोट्यानुसार भाजपला स्थायी समितीत १० सदस्य मिळण्याची शक्यता आहे. याउलट शिवसेना (शिंदे गट) आणि उद्धव ठाकरे गटाला प्रत्येकी २ सदस्य मिळू शकतात. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उतरत्या क्रमाने एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

काँग्रेस आणि मनसेला बसणार फटका

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि मनसे या दोन्ही पक्षांचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात घटले आहे. काँग्रेसचे नगरसेवक मागील टर्मच्या तुलनेत निम्म्यावर आले असून, कोट्याअभावी यंदा काँग्रेसला स्थायी समितीत प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता नाही. मनसेचीही परिस्थिती तशीच असून, केवळ एकच नगरसेवक निवडून आल्याने त्यांनाही स्थायी समितीबाहेर राहावे लागणार आहे.

advertisement

महापौरपदासाठी हालचालींना वेग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोन मित्रांनी ठरवलं! बिझनेस आयडियाने सगळ्यांचं मन जिंकलं, मुंबईतच नाही तर परराज्
सर्व पहा

महापौरपदासाठी लवकरच आरक्षण सोडत होणार असली तरी, त्याआधीच इच्छुक नगरसेवकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेषतः ओबीसी आणि राखीव प्रवर्गातील ज्येष्ठ नगरसेवक सक्रिय झाले असून, महापौरपद किंवा किमान स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. भाजपमधून पाचव्यांदा निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत खोजे, तसेच सुधिया खोडे आणि माजी आमदार सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांची नावे चर्चेत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक महापौरपदाआधीच स्थायी समितीचा फॉर्म्युला ठरला? कुणाला किती जागा मिळणार? अपडेट आली समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल