याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील बांधकाम कामगारांसाठी 32 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. नोंदणीकृत कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि 18 वर्षांखालील दोन मुलांना दोन लाखांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार, तपासणी आणि शस्त्रक्रिया असे लाभ मिळत आहेत.
Heart Surgery: एकही टाका न घालता पार पडली हार्ट सर्जरी! पुण्यातील डॉक्टरांनी नेमकं केलं काय?
advertisement
कुठे आणि कशी करायची नोंदणी?
नाव नोंदणीसाठी कामगारांना मासिक एक रुपया शुल्क भरावं लागते. नोंदणीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, रहिवासी दाखला, मागील 90 दिवसांमध्ये केलेल्या कामाचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. नोंदणीचं नुतनीकरण देखील करता येतं.
पुण्याचे कामगार उपायुक्त निखिल वाळके म्हणाले, "बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. जिल्ह्यात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ज्या कामगारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीनुसार ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी."
या योजनांमुळे कामगारांचं जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होत आहे. या योजनेतंर्गत नोंदणीकृत कामगारांना गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतात. तसेच, त्यांच्या कुटुंबाला आणि 18 वर्षाखालील दोन मुलांनाही याचा लाभ घेता येतो. त्यामुळे उपचारांदरम्यान त्यांना मोठ्या खर्चाचा भार सहन करावा लागत नाही
बांधकाम कामगारांचा 10 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 50 टक्क्यांच्या मर्यादेत दरवर्षी 6 हजार, 15 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75 टक्के मर्यादेत वर्षाला 9 हजार, तर 20 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर वर्षाला 12 हजार निवृत्तिवेतन देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.