TRENDING:

पेट्रोल न मिळाल्यामुळे तरुणाला आलं टेन्शन, दारूच्या नशेत दुचाकी रस्त्यावर पेटवली, छ.संभाजीनगरमधला VIDEO

Last Updated:

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आणि वाहतूक सुरळीत केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सिल्लोड: इराण आणि इस्त्रायलमधील युद्धामुळे जगभरात इंधनचा तुडवडा निर्माण झाला आहे. भारतातही अनेक भागामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे केंद्र सरकार इंधनाचा तुटवडा झाला नाही असं सांगत आहे. पण, ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपावर मात्र, टंचाई जाणवत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये "पेट्रोल मिळत नसेल तर गाडी कशाला पाहिजे' असं म्हणत तरुणाने भर रस्त्यावर स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण, हा दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील  सिल्लोड तालुक्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवेमुळे एका तरुणाने पेट्रोल डिझेल मिळणार नसेल तर मोटरसायकल काय करायची असं म्हणत भररस्त्यात स्वतःची मोटारसायकल पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे.

.

शरद भोजने असं दुचाकी पेटवणाऱ्या तरुणाचे नाव असून, हा प्रकार सिल्लोड-कन्नड मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आणि वाहतूक सुरळीत केली.

दारू प्यायलेला होता तरुण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

दरम्यान, संबंधित तरुण दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली असून, सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पेट्रोल न मिळाल्यामुळे तरुणाला आलं टेन्शन, दारूच्या नशेत दुचाकी रस्त्यावर पेटवली, छ.संभाजीनगरमधला VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल