माओवाद विरोधी अभियानात गडचिरोली जिल्ह्यासहलगतच्या तेलंगणा, छत्तीसगडमध्ये हेलिकॉप्टरचा वापर होतो. मात्र हेलिकॉप्टर ऐवजी चक्क विमानच घिरट्या घालू लागल्याने नेमकं हे विमान कुणाचं होतं. या संदर्भात उत्सुकता वाढली.
OMG! चक्क आकाशात उडू लागली गाय; VIRAL VIDEO पाहून सर्वजण थक्क
शुक्रवारी दुपारी चारनंतर सिरोंचा तालुक्याच्यसह सीमा लगतच्या तेलंगणाच्या हद्दीतही तब्बल दोन ते तीन वेळा या लहान विमानाने घिरट्या घातल्या. मात्र, या भागात विमानतळ नसल्याने हे लहान विमान अत्यंत खालच्या पातळीवरून गेल्याने अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली होती. या संदर्भात प्रशासकीय यंत्रणेने आणि पोलीस विभागाने माहिती मिळवली.
नॅशनल एरोजिओफिजिकल मॅपिंग प्रोग्राम अंतर्गत भारतातील जमिनीचं सर्वेक्षण करण्यासाठी हे खाजगी कंपनीचे लहान विमान वापरलं जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. आंध्र प्रदेशातून या विमानाचं उड्डाण नियंत्रित होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकल्पांतर्गतच हे विमान सिरोंचा तालुक्यासह लगतच्या तेलंगणाच्या हद्दीतूनही घिरट्या घालत होतं. या विमानामुळे कोणताही धोका नाही हे स्पष्ट झालं आहे.
विमानाबाबत इंटरेस्टिंग फॅक्ट्स
विमानाबाबत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहिती नाही.
विमान कशावर चालतं?
विमान किंवा हेलिकॉप्टरसारख्या कोणत्याही जेटसाठी विशेष इंधन असते. या जेट इंधनाला एव्हिएशन केरोसीन म्हणतात आणि ते एव्हिएशन टर्बाइन फ्यूएल (एटीएफ) म्हणूनही ओळखलं जातं. हे पेट्रोलियममधून मिळविलेले डिस्टिलेट द्रव आहे. हे इंधन व्यावसायिक हवाई वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. एक कारण म्हणजे हे इंधन पेट्रोल आणि डिझेलपेक्षा खूपच हलके आहे. पाण्याची घनता आणि या इंधनात फारसा फरक नाही. विमानाच्या पंखांमध्ये इंधनाचे टँकर असतात. यामध्ये हे इंधन भरलं जातं.
Oh no! टेक ऑफ करताच प्लेनचं चाक निखळून जमिनीवर कोसळलं; विमान लँड होताना काय घडलं पाहा थरारक VIDEO
रांचीचे हवाई वाहतूक तज्ज्ञ संजीत कुमार लोकल18ला दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत विमानसेवा आणि आंतरराष्ट्रीय धावांसाठी एव्हिएशन टर्बाइन फ्यूएलचे दर वेगवेगळे आहेत. देशांतर्गत बद्दल बोलायचे तर, दिल्लीत एव्हिएशन टर्बाइन फ्यूएलची किंमत 1,07,750 रुपये प्रति किलोलिटर आहे. म्हणजे एका लिटरची किंमत सुमारे 107 रुपये आहे. एका किलोलिटरमध्ये 1000 लिटर तेल असते.
विमानाचे टायर का फुटत नाहीत?
विमानाचे टायर हे कशापासून बनवलेले असतात की एवढ्या मोठ्या वजनाने इतक्या वेगाने उड्डाण करूनही ते फुटत नाहीत. विमानाचे टायर वाहनांच्या टायर्सपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. याच्या टायर्समध्ये, अॅल्युमिनियम आणि स्टीलसारखे इतर अनेक पदार्थ देखील रबरमध्ये मिसळले जातात. कारच्या टायरपेक्षा विमानाच्या टायरमध्ये हवा 6 पट जास्त दाबाने भरलेली असते. म्हणूनच ते इतके वजन सहन करण्यास सक्षम आहेत.
एक टायर किती दिवस टिकते?
विमानाचे टायर किती काळ टिकू शकतात? या प्रश्नाचे उत्तर थोडे अवघड असू शकते, कारण त्याचा टायरचा वापर दिवसांवर अवलंबून नाही तर विमानाचा प्रकार आणि इतर गोष्टींवर अवलंबून आहे. त्यांच्या क्षमतेनुसार विमानांचे अनेक प्रकार आहेत. काही विमानं फक्त मालवाहू आहेत तर काही प्रवासी वाहतूक करणारी आहेत. अशा स्थितीत टायर किती दिवस वापरात आले. हे सर्व विमानाची आतापर्यंत किती उड्डाणे झाली आहेत त्यावर अवलंबून आहे. चला तर मग जाणून घेऊया टायर किती उड्डाणांसाठी वापरले जाऊ शकतात.
टायरमधून किती उड्डाण केले जाऊ शकतात?
विमानाच्या एका टायरने टेकऑफ आणि लँडिंग सुमारे 500 वेळा केले जाते. यानंतर, पुढील 500 वेळा वापरण्यासाठी त्यावर एक ग्रिप बसवली जाते. अशा प्रकारे टायरवर एकूण सात वेळा ग्रिप बसवता येते. त्यानुसार एका टायरने सुमारे 3500 वेळा टेकऑफ आणि लँडिंग करता येते. त्यानंतर हे टायर काही उपयोगाचे नसून ते निवृत्त केले जातात.
टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो
विमानाच्या टायरमध्ये सामान्य गॅसऐवजी नायट्रोजन गॅस भरला जातो. कारण नायट्रोजन गॅस इतर गॅसच्या तुलनेत कोरडा आणि हलका असतो. यावर तापमानाचा फारसा परिणाम होत नाही. जाणकार लोक सांगतात की विमानाचा फक्त एक टायर 38 टन वजन सहन करू शकतो.
