Oh no! टेक ऑफ करताच प्लेनचं चाक निखळून जमिनीवर कोसळलं; विमान लँड होताना काय घडलं पाहा थरारक VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
विमानानं चाक विमानापासून वेगळं होतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : विमान हवेत असताना कधी दरवाजा उघडला, कधी खिडकी तुटली अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता विमानाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात विमानानं टेक ऑफ करताच त्याचा टायर निखळला. टायर तुटून खाली जमिनीवर कोसळला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील ही धक्कादायक घटना आहे. युनायटेड एअरलाइन्सचं बोइंग 777 विमान सॅन फ्रान्सिस्कोहून जपानला जात होतं. विमानात 235 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर्स होते. विमान आकाशात झेपावताच त्याचं टायर त्याच्यापासून वेगळं झालं.
तुम्ही पाहू शकता टेकऑफनंतर काही सेकंदात विमानाच्या डाव्या बाजूच्या मुख्य लँडिंग गियर असेंबलीतील सहा टायरपैकी एक टायर निखळला. आकाशातून जमिनीवर कोसळलेलं हे चाक सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंग एरियामध्ये कारवर पडलं. कारच्या मागील खिडकीला टायर धडकलं.
advertisement
A United Airlines jetliner bound for Japan made a safe landing in Los Angeles on Thursday after losing a tire while taking off from San Francisco. pic.twitter.com/9dKM6Qc1tp
— The Associated Press (@AP) March 8, 2024
अखेर लॉस एंजेलिसमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
advertisement
विमानाच्या टायरबाबत इंटरेस्टिंग फॅक्ट्स
विमानाच्या टायरबाबत अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या अनेकांना माहिती नाही.
विमानाचे टायर का फुटत नाहीत?
विमानाचे टायर हे कशापासून बनवलेले असतात की एवढ्या मोठ्या वजनाने इतक्या वेगाने उड्डाण करूनही ते फुटत नाहीत. विमानाचे टायर वाहनांच्या टायर्सपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. याच्या टायर्समध्ये, अॅल्युमिनियम आणि स्टीलसारखे इतर अनेक पदार्थ देखील रबरमध्ये मिसळले जातात. कारच्या टायरपेक्षा विमानाच्या टायरमध्ये हवा 6 पट जास्त दाबाने भरलेली असते. म्हणूनच ते इतके वजन सहन करण्यास सक्षम आहेत.
advertisement
एक टायर किती दिवस टिकते?
विमानाचे टायर किती काळ टिकू शकतात? या प्रश्नाचे उत्तर थोडे अवघड असू शकते, कारण त्याचा टायरचा वापर दिवसांवर अवलंबून नाही तर विमानाचा प्रकार आणि इतर गोष्टींवर अवलंबून आहे. त्यांच्या क्षमतेनुसार विमानांचे अनेक प्रकार आहेत. काही विमानं फक्त मालवाहू आहेत तर काही प्रवासी वाहतूक करणारी आहेत. अशा स्थितीत टायर किती दिवस वापरात आले. हे सर्व विमानाची आतापर्यंत किती उड्डाणे झाली आहेत त्यावर अवलंबून आहे. चला तर मग जाणून घेऊया टायर किती उड्डाणांसाठी वापरले जाऊ शकतात.
advertisement
टायरमधून किती उड्डाण केले जाऊ शकतात?
विमानाच्या एका टायरने टेकऑफ आणि लँडिंग सुमारे 500 वेळा केले जाते. यानंतर, पुढील 500 वेळा वापरण्यासाठी त्यावर एक ग्रिप बसवली जाते. अशा प्रकारे टायरवर एकूण सात वेळा ग्रिप बसवता येते. त्यानुसार एका टायरने सुमारे 3500 वेळा टेकऑफ आणि लँडिंग करता येते. त्यानंतर हे टायर काही उपयोगाचे नसून ते निवृत्त केले जातात.
advertisement
टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो
विमानाच्या टायरमध्ये सामान्य गॅसऐवजी नायट्रोजन गॅस भरला जातो. कारण नायट्रोजन गॅस इतर गॅसच्या तुलनेत कोरडा आणि हलका असतो. यावर तापमानाचा फारसा परिणाम होत नाही. जाणकार लोक सांगतात की विमानाचा फक्त एक टायर 38 टन वजन सहन करू शकतो.
Location :
Delhi
First Published :
Mar 08, 2024 12:06 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Oh no! टेक ऑफ करताच प्लेनचं चाक निखळून जमिनीवर कोसळलं; विमान लँड होताना काय घडलं पाहा थरारक VIDEO









