Accident Video: बाईक आणि कारची जबर धडक, तरीही मृत्यूच्या दारातून परत आली व्यक्ती!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. रस्त्यांवर अनेक एकापेक्षा एक भीषण अपघात घडताना समोर येत असतात. काही अपघातांचे व्हिडीओही समोर येतात.
नवी दिल्ली : अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. रस्त्यांवर अनेक एकापेक्षा एक भीषण अपघात घडताना समोर येत असतात. काही अपघातांचे व्हिडीओही समोर येतात. असाच एक अपघाताचा हैराण करणारा व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये एक कारची बाईकला धडक होते. या धडकेचं दृश्य पाहून तुम्हीही चकीत व्हाल.
रस्त्यावर भरधाव वेगानं बाईक आणि कार येत असते आणि दोन्हींची धडक होते. जोरदार धडकेत बाईक उडते आणि सोबत गाडीचा ड्राव्हरही उडतो. पण तो स्वतःला ज्या प्रकारे सावरतो ते थक्क करणारं आहे. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही शॉक व्हाल.
advertisement
अपघाताच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कार आणि बाईक दोन्हीही वेगानं येत आहेत. दोन्ही गाड्या एकमेकांना धडकतात आणि या धडकेत बाईक उडून दूर पडते. बाईकसोबत बाईकस्वारही उडतो मात्र तो उडून उभा राहतो. सुदैवानं या अपघात त्याला काहीच होत नाही. तो एखाद्या स्टंटमॅनसारखा स्टंट करत असल्याचं वाटतं.
@BannedVlds नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 6 सेकंदांचा हा अपघात खूपच विचित्र आहे. व्हिडीओवर अनेक निरनिराळ्या कमेंट येताना दिसत आहेत.
advertisement
— Banned vids (@BannedVlds) March 5, 2024
दरम्यान, असे अपघाताचे अनेक भयानक आणि धक्कादायक घटना समोर येत असतात. कधी कसा अपघात होईल सांगता येत नाही. त्यामुळे रस्त्याने चालताना किंवा गाडी चालवताना काळजी घेण्यासाठी सांगितलं जातं. वाहतुक नियमांचं पालन करण्यास म्हटलं जातं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2024 5:04 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Accident Video: बाईक आणि कारची जबर धडक, तरीही मृत्यूच्या दारातून परत आली व्यक्ती!







