dry ice: ड्राय आइस म्हणजे काय? सावधान! हे खाण्यानं शरीरातले अवयव होऊ शकतात निकामी!
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
गुरुग्राममधला ला फॉरेस्टा कॅफे ड्राय आइसमुळे चर्चेत आला. त्या कॅफेमध्ये रात्री जेवणासाठी आलेल्या पाच ग्राहकांना माउथ फ्रेशनर म्हणून एका कर्मचाऱ्यानं ड्राय आइस दिला आणि ते खाताच त्यांच्या तोंडात जळजळ झाली आणि तोंडातून रक्त येऊ लागलं.
नवी दिल्ली : गुरुग्राममधला ला फॉरेस्टा कॅफे ड्राय आइसमुळे चर्चेत आला. त्या कॅफेमध्ये रात्री जेवणासाठी आलेल्या पाच ग्राहकांना माउथ फ्रेशनर म्हणून एका कर्मचाऱ्यानं ड्राय आइस दिला आणि ते खाताच त्यांच्या तोंडात जळजळ झाली आणि तोंडातून रक्त येऊ लागलं. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. कोणत्याही हॉटेलमध्ये माउथ फ्रेशनर म्हणून तुम्हाला कोणता पदार्थ दिला जातोय, ते नक्की तपासून पाहा आणि मगच त्याचं सेवन करा. या सगळ्या प्रकारामुळं कॅफेमधल्या अन्नसुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ड्राय आइस हा नेमका काय प्रकार आहे?
ड्राय आइस म्हणजे नेमकं काय?
ड्राय आइस हा नावाप्रमाणेच कोरडा असतो. कार्बन डाय ऑक्साइडचं स्थायू रूप म्हणजे ड्राय आइस. हा सर्वसाधारण बर्फापेक्षा म्हणजे पाण्याच्या बर्फापेक्षा दीर्घ काळ गार राहू शकतो. ड्राय आइसचं वैशिष्ट्य असं, की हा बर्फ पाण्यापासून तयार केला जात नाही. त्यामुळं जेव्हा हा ड्राय आइस वितळायला सुरुवात होते, तेव्हा पाण्याऐवजी त्यातून धूर येऊ लागतो.
advertisement
गुरुग्राममधली घटना
गुरुग्राममधल्या एका हॉटेलमध्ये जेवणानंतर कर्मचाऱ्यानं ग्राहकांना माउथ फ्रेशनर आणून दिला. तो माउथ फ्रेशनर म्हणजे ड्राय आइस होता. ग्राहकांना याची कल्पना नसल्यानं त्यांनी तो खाल्ला आणि त्यांना त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडली. वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार केल्यानंतर या ग्राहकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
advertisement
कुठे होतो ड्राय आइसचा वापर?
ड्राय आइसचा वापर कार्बोनेटेड ड्रिंक्स फ्लॅश–फ्रीज करण्यासाठी, आइस्क्रीम तयार करण्यासाठी, तसंच औषधांचा पुरवठा करताना ती औषधं साठवण्यासाठी होतो. लग्नसमारंभ, पार्टी यातले स्पेशल इफेक्ट, एअरलाइन केटरिंगमध्ये अन्नपदार्थ ताजे ठेवण्यासाठीसुद्धा ड्राय आइस वापरला जातो.
ड्राय आइस आपण खाऊ शकतो का?
एफएसएसएआय, सीडीसी आणि एफडीआय यांसारख्या यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राय आइस कधीच खाऊ नये. कारण याला स्पर्श जरी केला किंवा तो शरीरात गेला तर त्वचा आणि शरीराच्या आतल्या अवयवांना यामुळे गंभीर इजा होऊ शकते. इतकंच नाही, तर याचा वापर एखाद्या बंद बंद खोलीत झाला तरी श्वसनाचा त्रास उद्भवू शकतो. यामुळं जीवावर बेतू शकतं, इतका हा हानिकारक आहे. त्यामुळं याचा वापर नेहमी मोकळ्या आणि चांगल्या हवेतच झाला पाहिजे. माउथ फ्रेशनरच्या नावाखाली दिला जाणारा ड्राय आइस हा एक ॲसिडसारखाच एक प्रकार म्हणता येईल, असं काही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. याचं सेवन करताच तोंडापासून पुढे शरीरातला अंतर्गत भाग जळाल्यासारखा भास होतो आणि मग तोंडातून रक्तही येतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2024 6:51 AM IST
मराठी बातम्या/Viral/
dry ice: ड्राय आइस म्हणजे काय? सावधान! हे खाण्यानं शरीरातले अवयव होऊ शकतात निकामी!









