भारतीय खाण्याच्या या गोष्टींवर सर्वाधिक पैसे करतात खर्च! तुम्हाला माहितीय का?

Last Updated:

भारतीय ग्राहक खाण्या-पिण्याच्या बाबतीत कुठल्या गोष्टींवर सर्वाधिक खर्च करतात याचा अभ्यास नुकताच एका सर्वेक्षणात करण्यात आला.

भारतीय खाण्याच्या या गोष्टींवर सर्वाधिक पैसे करतात खर्च!
भारतीय खाण्याच्या या गोष्टींवर सर्वाधिक पैसे करतात खर्च!
नवी दिल्ली : भारतीय ग्राहक खाण्या-पिण्याच्या बाबतीत कुठल्या गोष्टींवर सर्वाधिक खर्च करतात याचा अभ्यास नुकताच एका सर्वेक्षणात करण्यात आला. त्यात धान्य, फळफळावळ, भाज्या, मांस नाही तर दूधावर भारतीय ग्राहक सर्वाधिक पैसे खर्च करत असल्याचं समोर आलं आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या हाउसहोल्ड कंझम्प्शन एक्सपेंडिचर सर्व्हे 2022-23 मधून ही गोष्ट समोर आली आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील ग्राहक सर्वाधिक पैसे दूधावर खर्च करत असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून येतं. ग्रामीण भागातील ग्राहक महिन्याला 314 रुपये तर शहरी भागातील ग्राहक महिन्याला 466 रुपये दूध खरेदीसाठी वापरतात असं या सर्वेक्षणातून समोर येतं.
ग्रामीण भागात दरमहा भाजीवर 203 रुपये, धान्य खरेदीवर 185 रुपये तर अंडी, मासे, मांस खरेदीवर 185 रुपये खर्च करतात. फळांवर 140 रुपये, खाद्यतेलावर 136 रुपये आणि मसाल्यांवर 113 रुपये तर डाळींवर 76 रुपयांचा खर्च होतो. शहरी भागात सुमारे 246 रुपयांची फळं, 245 रुपयांच्या भाज्या, 235 रुपयांचं धान्य, अंडी, मांस, मासे यांच्यावर 231 रुपये, खाद्यतेलावर 138 रुपये आणि डाळींवर 90 रुपये दर महिन्याला खर्च होतात असं हा सर्व्हे सांगतो.
advertisement
तज्ज्ञ सांगतात की भारतात दूध हे पूर्णान्न मानलं जातं. त्यामुळे दुधाचा खप वेगाने वाढला आहे. दूधाचा आहारातील समावेश वाढल्यामुळे भारताच्या एकूण आरोग्यमानावर त्याचा चांगला परिणाम दिसतो. दुधातील पोषक घटक आरोग्यासाठी चांगले ठरतात. दूध पिण्यामुळे कुपोषण कमी होण्यास मदत होते. ग्राहक मंत्रालयाच्या एका अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत दुधाच्या किमती 42 रुपये लिटरवरुन 60 रुपये लिटरपर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्या वर्षभरात दूध सगळ्यात महाग झालं अहे. मात्र तरीही या किंमतींचा दुधाच्या खपावर कुठलाही परिणाम झालेला नाही. देशात दूध सर्वाधिक वापरलं जातं असं नाही तर जागतिक दूध उत्पादनात भारताचं योगदान 24.64 टक्के एवढं आहे.
advertisement
गेल्या नऊ वर्षांत दूध उत्पादनात सुमारे 58 टक्के वाढ झाली आहे. 2022-23 मध्ये भारताने 230.58 मेट्रिक टन इतकं दुग्धोत्पादन केलं. दूध उत्पादनात राजस्थानचा (15.5 टक्के) पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर अनुक्रमे उत्तर प्रदेश (14.93 टक्के), मध्य प्रदेश (8.6 टक्के), गुजरात (7.56 टक्के) आणि आंध्र प्रदेशचा (6.97 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो. देशातील एकूण दूध उत्पादनात या पाच राज्यांचं योगदान 53.11 टक्के आहे. विशेष म्हणजे आपला शेजारी देश पाकिस्तानही याबाबतीत आपल्याच सारखा आहे. महागाईने गांजलेल्या पाकिस्तानातील नागरिकही दूधावर सर्वाधिक पैसे खर्च करतो. पाकिस्तानी लोक महिन्याला 168.5 रुपये दुधावर खर्च करतात. फळं आणि भाज्यांवर 68.3 रुपये, अंड्यांवर नऊ रुपये आणि मासे खरेदीवर महिन्याला तीन रुपये खर्च करतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
भारतीय खाण्याच्या या गोष्टींवर सर्वाधिक पैसे करतात खर्च! तुम्हाला माहितीय का?
Next Article
advertisement
High Court On Mumbai Air Pollution: हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर्टात घडलं काय?
हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर
  • हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून (AQI) उच्च न्यायालयाने आज महापालिका प्रशासनाचे अक्

  • याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर धक्कादायक माहिती मांडली.

  • महापालिका आयुक्तांचे वेतन का रोखू नये असा सवाल हायकोर्टाने विचारला.

View All
advertisement