सर्दी-खोकला झालं वाटलं पण निघाला गंभीर आजार, महिलेला कापावे लागले हात-पाय
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
कधी कधी छोटा वाटणारा आजार खूप गंभीरही ठरतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला. सर्दी खोकला झालं समजून महिलेला तिचे हात-पाय कापावे लागले. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया.
नवी दिल्ली : वातावरण बदलानुसार किंवा लाइफस्टाइलमध्ये काही बदल झाल्यावर सर्दी खोकला होत असतो. हा संसर्गजन्य रोग असून साधारणपणे सर्वांनाच होत असतो. कोणाला सर्दी खोकला झाल्यावर लोक डॉक्टरकडे जाऊन मेडिसिन घेतात. मात्र कधी कधी छोटा वाटणारा आजार खूप गंभीरही ठरतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला. सर्दी खोकला झालं समजून महिलेला तिचे हात-पाय कापावे लागले. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया.
महिलेला सर्दी खोकला झाला होता मात्र खरंतर तो एक गंभीर आजार होता. आणि या आजारामुळे तिला तिचे हात-पाय गमवावे लागले. हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्हालाही नॉर्मल काही त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरकडे जा अन्यथा तुमच्यासोबतही असा प्रकार घडेल.
advertisement
शेरी मुडी नावाच्या 51 वर्षाच्या महिलेसोबत हा प्रकार घडला. शेरी एक शिक्षक आहे. ती शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सहलीला गेली होती. मात्र अचानक तिचे हात पाय थंड पडायला लागले. मात्र तिला वाटलं हा नॉर्मल सर्दी खोकला असेल. मात्र पाच दिवसांत महिलेची पूर्ण तब्बेत कोसळली आणि तिला हॉस्पिटल गाठावं लागलं.
डॉक्टरांनी शेरीचं चेकअप केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही इन्फेक्शन आहे. शेरीला स्ट्रेप्टोकॉकस नावाचं इन्फेक्शन झालं होतं. काहीच वेळात महिलेच्या पूर्ण शरीरात हे इन्फेक्शन पसरलं. ज्यामुळे तिचे हात पाय कापावे लागले. एका इन्फेक्शनने महिलेला आयुष्यभरासाठी व्हिलचेअरवर बसवलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2024 8:32 PM IST










