Sarfaraz Khan : गंभीर बघतोय ना रे बाबा! सरफराजने रणजी ट्रॉफीत ठोकली डबल सेंच्युरी, सिलेक्टरला जोरदार प्रत्युत्तर

Last Updated:

Sarfaraz Khan double century in Ranji Trophy 2026 : सरफराज खानच्या या वादळी खेळीमुळे मुंबईच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 450 रन्सचा टप्पा पार केला आहे. सरफराजने मॅचच्या पहिल्याच दिवशी आपलं शतक पूर्ण केलं होतं.

Sarfaraz Khan double century in Ranji Trophy 2026
Sarfaraz Khan double century in Ranji Trophy 2026
Sarfaraz Khan scored double century : कितीबी समोर येऊंद्या, त्यांना एकटा बास! हे गाणं सध्या कोणत्या खेळाडूला सुट होत असेल तर त्याचं नाव सरफराज खान... रणजी ट्रॉफी 2026 च्या ग्रुप डी मधील मॅचमध्ये मुंबईच्या सरफराज खानने पुन्हा एकदा आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. हैदराबादविरुद्ध खेळताना सरफराजने शानदार दुहेरी शतक झळकावलं. सरफराजने केवळ 206 बॉल्समध्ये 19 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने हा टप्पा गाठला. सरफराजच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील कारकिर्दीतील हे 5 वं दुहेरी शतक असून त्याच्या नावावर एक तिहेरी शतकही नोंदवलेलं आहे.

450 रन्सचा टप्पा पार

सरफराज खानच्या या वादळी खेळीमुळे मुंबईच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 450 रन्सचा टप्पा पार केला आहे. सरफराजने मॅचच्या पहिल्याच दिवशी आपले शतक पूर्ण केले होते. दुसऱ्या दिवशीही त्याने आपली लय कायम राखली. ताज्या माहितीनुसार, तो 218 बॉल्समध्ये 227 रन्सवर खेळत असून सुवेद पारकर त्याला 65 रन्सवर मोलाची साथ देत आहे. या खेळीने त्याने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.
advertisement

मोहम्मद सिराज टॉस जिंकला

या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन मोहम्मद सिराज याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईची सुरुवात तशी अडखळती झाली. अखिल हरवाडकर आणि आकाश आनंद यांनी 60 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली खरी, पण अखिल 27 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर लगेचच आकाशही 35 रन्सवर माघारी परतला आणि मुंबईची अवस्था 2 विकेट्सवर 66 रन्स अशी झाली.
advertisement

छोटा भाऊ फेल

मुंबईला तिसरा धक्का मुशीर खानच्या रूपाने बसला, जो केवळ 11 रन्स करून माघारी परतला. 82 रन्सवर 3 महत्त्वाच्या विकेट्स गेल्याने मुंबई दबावाखाली आली होती. मात्र, इथून सिद्धेश लाड आणि सरफराज खान यांनी सूत्रे आपल्या हातात घेतली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 249 रन्सची ऐतिहासिक पार्टनरशिप केली. सिद्धेश लाड 104 रन्सची शतकी खेळी करून आऊट झाला, पण तोपर्यंत मुंबईने मजबूत पकड मिळवली होती.
advertisement

हैदराबादचे बॉलर हतबल

मॅचच्या पहिल्या दिवशी सरफराजने 164 बॉल्समध्ये 5 सिक्स आणि 11 फोरच्या मदतीने नाबाद 142 रन्स केले होते. हैदराबादकडून बॉलिंग करताना सिराज आणि नितीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली, तर रोहित रायुडू याने 2 बॅट्समनना आऊट करण्यात यश मिळवले. मात्र, सरफराजच्या आक्रमक खेळीसमोर हैदराबादचे बॉलर हतबल दिसले. सरफराजने पुन्हा एकदा आपण मोठ्या इनिंगचा खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sarfaraz Khan : गंभीर बघतोय ना रे बाबा! सरफराजने रणजी ट्रॉफीत ठोकली डबल सेंच्युरी, सिलेक्टरला जोरदार प्रत्युत्तर
Next Article
advertisement
High Court On Mumbai Air Pollution: हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर्टात घडलं काय?
हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर
  • हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून (AQI) उच्च न्यायालयाने आज महापालिका प्रशासनाचे अक्

  • याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर धक्कादायक माहिती मांडली.

  • महापालिका आयुक्तांचे वेतन का रोखू नये असा सवाल हायकोर्टाने विचारला.

View All
advertisement