दुधावर येईल भाकरीसारखी जाड साय, गृहिणीने सांगितली 'ही' भन्नाट ट्रिक; फक्त 2-3 दिवसांच्या सायीत निघेल किलोभर तूप
- Published by:Devika Shinde
Last Updated:
फक्त 2-3 दिवसांची साय साठवून तुम्ही चक्क 1 किलो तूप काढू शकता. ही ट्रिक नेमकी काय आहे आणि दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती? चला जाणून घेऊया.
सकाळी उठल्या उठल्या चहासाठी जेव्हा आपण दुधाचं पातेलं हातात घेतो, तेव्हा आपली पहिली नजर जाते ती दुधावरच्या सायीवर. जर साय जाड आणि मऊ असेल, तर गृहिणीचा अर्धा आनंद तिथेच असतो. कारण याच सायीपासून पुढे घरचं शुद्ध साजूक तूप बनतं. पण अनेकदा आपली तक्रार असते की, "दूध तर चांगलं आणतो, पण साय मात्र अगदी पातळ येते." विशेषतः पॅकेटच्या दुधावर साय नीट येतच नाही.
advertisement
advertisement
1. सुरुवातीची तयारी: पातेल्याची 'ही' युक्तीस्वीटी पटेल यांच्या मते, साय जाड येण्याची प्रक्रिया दूध गरम करण्यापूर्वीच सुरू होते.दूध नेहमी स्वच्छ भांड्यात गाळून घ्या. दीड लिटर दुधात अर्धा ग्लास पाणी नक्की टाका. यामुळे दूध तळाला करपत नाही आणि मंद आचेवर जास्त वेळ उकळलं जातं.महत्त्वाची टीप: पातेल्याच्या कडांना वरच्या बाजूने थोडं तूप लावा. यामुळे दूध उतू जात नाही आणि साय कडांना न चिकटता मधोमध जाड जमते.
advertisement
2. 'या' दोन गोष्टींमुळे येईल जाड सायआता वळूया त्या मुख्य ट्रिककडे. जेव्हा दूध गरम व्हायला लागेल, तेव्हा त्यात तांदळाचे 6-7 दाणे टाका आणि चमच्याने एकदा हलवून घ्या. तांदळातील स्टार्चमुळे दुधाच्या वरच्या थराला एक प्रकारचा घट्टपणा येतो, ज्यामुळे साय चपातीसारखी जाड आणि जड तयार होते. काळजी करू नका, यामुळे दुधाच्या चवीत कोणताही बदल होत नाही.
advertisement
3. उकळल्यानंतरची 'ही' चूक टाळादूध उकळलं की आपण लगेच त्यावर घट्ट झाकण ठेवतो, पण इथेच आपली चूक होते. दूध उकळल्यावर गॅस बंद करा आणि त्यावर पूर्ण झाकण न ठेवता जाळीदार चाळण ठेवा. घट्ट झाकणामुळे वाफ आतच साचते आणि पाण्याचे थेंब सायीवर पडतात, ज्यामुळे साय पातळ होते. जाळीमुळे वाफ बाहेर निघून जाते आणि साय कोरडी आणि थरदार जमते.
advertisement
advertisement









