Gadchiroli News : गडचिरोलीत घिरट्या गालणाऱ्या विमानाने वाढवली धडधड! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात घिरट्या घालणाऱ्या एका विमानाने नागरिकांची चांगलीच धडधड वाढवली आहे.
गडचिरोली, (महेश तिवारी, प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यात घडलेली एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून आज दुपारी लहान विमान गिरट्या घालत होतं. हे विमान कोणाच होतं याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दुपारी चारनंतर सिरोंचा तालुक्याच्यसह सीमा लगतच्या तेलंगणाच्या हद्दीतही तब्बल दोन ते तीन वेळा या लहान विमानाने घिरट्या घातल्या. मात्र, या भागात विमानतळ नसल्याने हे लहान विमान अत्यंत खालच्या पातळीवरून गेल्याने अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अज्ञात विमानाच्या घिरट्या#gadchiroli pic.twitter.com/BW0ha18sXx
— News18Lokmat (@News18lokmat) March 8, 2024
माओवाद विरोधी अभियानात गडचिरोली जिल्ह्यासहलगतच्या तेलंगाना छत्तीसगडमध्ये हेलिकॉप्टरचा वापर होतो. मात्र, आज हेलिकॉप्टर ऐवजी चक्क विमानच घीरट्या घालू लागल्याने नेमकं हे विमान कुणाचं होतं. या संदर्भात उत्सुकता वाढली असून संदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडे अधिकृत माहिती नसल्याने या गिरट्या घालणाऱ्या विमानाचा रहस्य कायम होतं.
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
Mar 08, 2024 9:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gadchiroli News : गडचिरोलीत घिरट्या गालणाऱ्या विमानाने वाढवली धडधड! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल









