खरं तर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागल्यास एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी केली होती. मात्र भाजप शिंदेंना गृहखात देण्यास तयार नाही आहे. त्यात आता नगरविकास देखील शिंदेंना मिळणार की नाही,याची देखील हमी नाही आहे. त्यामुळे जरी दोनदा मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला एकनाथ शिंदे यांच्या नावाला पाठिंबा दिला असला तरी उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यास शिंदे उच्छुक नाही आहेत.
advertisement
गृह खातं सोडा, आता नगरविकास खातंही जाणार? भाजपचे एकनाथ शिंदेंवर दबावतंत्र
त्यात आताच काही वेळापुर्वी उदय सामंत यांनी जर एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार नसतील तर आम्हीद देखील मंत्रिपद स्विकारणार नाही, अशी भूमिका मांडली होती. तसेच एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, हे आमची कायमची भूमिका आहे. तसेच आमच्यामधून कुणाच्याही मनात उपमु्ख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसाव अशी इच्छा नाही. शिंदे सोडून मुख्यमंत्री होण्यास कुणीच इच्छुक नाही आहे. त्यामुळे आमचं करिअर आता शिंदेंच्या हातात, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं,अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे.
उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडल्यानंतर ते संजय शिरसाट यांच्यासह वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यास दाखल झाले आहेत. त्याच्यापाठोपाठ आता संकटमोचक गिरीश महाजन देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. आता गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाबाबत काय तोडगा निघतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
'...तर आम्ही मंत्रिपद स्विकारणार नाही', शिंदेंनंतर आता आमदाराची टोकाची भूमिका
गिरीश महाजन काय म्हणाले?
एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते शपथ घेणार आहेत. त्यांनी राजभवनावरही सांगितलं.त्यामुळे ते कुठेही नाराज नाहीयेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतच नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. तसेच एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातच राहतील ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी मला खात्री आहे,असा गिरीश महाजन यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
