जायकवाडीच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. यामुळे जायकवाडी धरणाच्या 18 नियमित आणि 9 आपत्कालीन दरवाजांमधून तब्बल 2 लाख 26 हजार क्युसेक्स एवढा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे.
या प्रचंड विसर्गामुळे गोदामाईला प्रचंड पूर आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. परतुर तालुक्यातील गोळेगाव हे गोदावरी नदीकाठी असलेल्या संवेदनशील असं गाव. आठ दिवसांआधी मुसळधार पाऊस झाला तेव्हा देखील या गावाला नदीने वेडा घातल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
आता पुन्हा एकदा गोदावरी नदीचा विसर्ग वाढल्याने या गावावर पूर संकट ओढावल आहे. घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य बाज खाट गॅस शेगडी गॅस टाकी अंथरून पांघरून तेल मीठ साखर चहापत्ती यासारखे जीवनावश्यक साहित्य घेऊन लहानगे तरुण अबालवृद्ध असे सर्व नागरिक गावातून बैलगाडी ट्रॅक्टर छोटा हत्ती एसटी बस अशा वेगवेगळ्या वाहनातून जवळच्याच आष्टी आणि लोणी गावांमध्ये आश्रय घेत आहेत.
advertisement
मागील अनेक वर्षांपासून आम्ही प्रशासनाकडे गावाचं पुनर्वसन करण्याची मागणी करत आहोत. परंतु आमच्या मागणीला दरवेळी केराची टोपली दाखवली जाते परंतु अवघ्या पंधरा दिवसात दोन वेळा आम्हाला जीव मुठीत धरून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आमच्या गावाचं धरणग्रस्तांच्या धरतीवर पुनर्वसन करावं अशी आमची प्रशासनाकडे कळकळीची विनंती आहे अस गावच्या सरपंचांनी लोकल 18 बरोबर बोलताना सांगितलं.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 28, 2025 9:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna News : गोदामाईचं रौद्ररुप, 15 दिवसांमध्ये 2 वेळा स्थलांतरीत होण्याची लोकांवर वेळ!