मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (26 जानेवारी) रोजी दुपारी ही घटना घडली. मृतकांमधे येरंडी / देवलगांव येथील 25 वर्षीय महिलेसह तिचा पाच महिन्याचे बाळ आणि शेजारील तीन वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्याला ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे.
तिघांचा मृत्यू
अर्जुनी मोर तालुक्यातील येरंडी / देवलगांव येथील संदिप राजु पंधरे (29 वर्षे) हा युवक आपल्या दुचाकीवर पत्नी चितेश्वरी संदिप पंधरे ( 25 वर्षे), मुलगा संचित संदिप पंधरे ( 5 महिने) आणि घराशेजारील पार्थवी रोहीत सिडाम ( 3 वर्षे) सह दुचाकीने गावावरून नवेगावबांध येथे जात होते. बाराभाटी - नवेगावबांध मार्गावरील भारती बारच्या जवळपास पाठीमागून येणाऱ्या भरधाव बोलोरो पिकअपने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील पत्न, मुलगा आणि शेजारील मुलाचा जाग्यावरच मृत्यू झाला. . तर दुचाकी चालक संदिप गंभीर जखमी आहे.
advertisement
संपूर्ण गावात शोककळा पसरली
घटनेची माहीती मिळताच नवेगावबांध पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले असून मृतांना आणि जखमीला नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. जखमी संदिप पंधरे यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी ये हलविण्यात आल्याची माहीती मिळाली आहे. दुचाकीला जबर धडक देणारा चारचाकी वाहन नवेगावबांध येथीलच असल्याची माहीती आहे. पाच महिन्याच्या चिमुकल्यासह आई आणि शेजारील तिन वर्षाच्या मुलीचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने पंधरे व सिडाम कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली.
घटनास्थळी गर्दी
घटनेची माहिती मिळताच येरंडी गावातील शेकडो नागरीकांनी घटनास्थळासह ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे एकच गर्दी केली. . नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक योगिता चाफले अपघाताच तपास करत आहेत.