गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नराधम बापानेच आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आरोपीची पत्नी सासरी नांदत नाही. गेल्या 10
advertisement
वर्षांपासून मुलीची आई माहेरी राहते. त्यामुळे अल्पवयीन मुलगी तिच्या आजी, लहान भाऊ आणि नराधम वडिलांसोबत राहत होती. आईचे छत्र नसल्याने मुलगी वडिलांसोबत झोपायची मात्र झोपेतच आरोपी बाप तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करायचा एवढच नाही तर कोणाला सांगू नको अशी धमकी देखील दिली होती.
रुग्णालयात गेल्यावर धक्कादायक समोर आलं...
काही महिन्यांपासून मुलगी पोटात दुखत असल्याचे वारंवार सांगायची, अखेर एक दिवशी वेदना असह्य झाल्याने आजीने तिला गोंदिया येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर झाले. धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि बापाचे हे घृणास्पद कृत्य समोर आले.
बापावर गंभीर गुन्हा दाखल
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलीसांनी गुन्हा दाखल केली. डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बापाविरुद्ध लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO) आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या विकृत बापाला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला असून नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणार नाही, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा :
