भाऊचा धक्का ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मार्गासाठी फेरीला अखेर मंजुरी मिळाली आहे. मात्र, मंत्री नितेश राणे म्हणाले की, हवामान चांगले झाल्यानंतरच ही सेवा सुरू केली जाईल. ही फेरी 25 नॉट्सच्या गतीने धावेल. पूर्वी ही सेवा गणेशोत्सव या सणाच्या वेळई जाहीर केली होती. पण, मंजुरी न मिळाल्यामुळे सुरूवात थोडी उशिरा झाली.
advertisement
मार्ग आणि वेळ
मुंबई ते रत्नागिरी फेरीचा प्रवास सुमारे 3 ते 3.5 तासांचा असेल तर मुंबई ते सिंधुदुर्गसाठी ही वेळ 5 ते 5.5 तास आहे. फेरीने प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाची संधी मिळणार आहे.
बसेसची सुविधा
रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गमध्ये फेरीतून उतरल्यानंतर प्रवाशांसाठी स्थानीय बसेसची व्यवस्था केली आहे. ही सुविधा प्रवाशांना शहरात सहज पोहोचण्यास मदत करेल आणि वाहनांची सोय नसलेल्या प्रवाशांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे फेरी सेवेतून संपूर्ण प्रवास आरामदायी आणि सुरळीत होईल
तिकीट दर
मुंबई ते कोकण रो-रो फेरीसाठी प्रवाशांसाठी विविध वर्गाचे तिकीट उपलब्ध आहे. फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी 9,000 हजार रुपये असे असेल तर बिझनेस क्लासचे तिकीट 7,500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जर प्रवाशांना थोडे कमी खर्चात आरामदायी प्रवास हवा असेल, तर प्रीमियम इकॉनॉमी 4,000 रुपये आणि इकॉनॉमी क्लास 2,500 रुपये दरात उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला आपल्या बजेटनुसार तिकीट घेता येईल.
वाहनांचे दर
रो-रो फेरीवर फक्त प्रवासी नव्हे, तर वाहनांनाही सोबत नेता येते. जर मोठी बस असल्यास 21,000 रुपये ,45-सीटर बस 17,000रुपये, तर 30-सीटर बस ₹14,500 मध्ये वाहता येईल. मिनी बस ₹13,000, कार किंवा SUV असल्यास प्रवाशांना 26,000 रुपये द्यावे लागतील आणि मोटरसायकल 1,000 रुपये दरात फेरीवर जाऊ शकतात. सायकलसाठी 600 रुपये शुल्क आहे. या सुविधेमुळे प्रवाशांसाठी त्यांच्या वाहनांसह प्रवास करणे खूप सोयीस्कर होणार आहे.
फेरीची क्षमता
एकाच वेळेस ही फेरी 656 प्रवासी, 50 चार-व्हील वाहन आणि 30 दोन-व्हील वाहन वाहून नेऊ शकते. त्यामुळे मोठ्या कुटुंबांसाठी, मित्रमंडळींसाठी ही सेवा सोयीस्कर ठरते.
जेट्टी स्थान
फेरीचे जेट्टी स्थान खालीलप्रमाणे आहे:
मुंबई: भाऊचा धक्का
रत्नागिरी: जालगड
सिंधुदुर्ग: विजयदुर्ग