TRENDING:

हर्षद खड्ड्यात काम करत होता, विशाल आला अन् गावठी कट्ट्यातून गोळी झाडली, बीडमधला खुनाचा VIDEO

Last Updated:

या प्रकरणातील आरोपी तीन दिवसानंतरही फरार असल्यानं नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. अशात बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  बीडमध्ये भर रस्त्यावर एका मजुराचा खून झाला आहे. गावठी कट्ट्यातून या मजुरावर गोळीबार केला आहे. या खुनाचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरातील अंकुशनगर भागात एका मजुराचा भर रस्त्यावर खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. या गोळीबार मजूर हर्षद शिंदे याचा मृत्यू झाला आहे.

आरोपी विशाल सुर्यवंशी हा एका दुचाकीवरुन येतो आणि रस्त्यावर खड्डा खोदणारा मजूर हर्षद शिंदे याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडत असल्याचं या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. अचानक झालेल्या हल्ल्याामुळे  हर्षद शिंदे आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढतो, परंतु आरोपी त्याचा पाठलाग करत असल्याचं दिसतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाटणाची गरजच नाही, भोगीची अशी भाजी बनवाल तर मिटक्या मारत खाल, पाहा रेसिपी VIDEO
सर्व पहा

हर्षद शिंदे काही अंतर पळत गेला, पण आरोपी विशाल सुर्यवंशीने त्याला गाठलं आणि  त्यानंतर शस्त्राचे वार करुन त्याचा खून केला. खून केल्यानंतर सुर्यवंशी हा दुचाकीवरुन पळून गेल्याचे देखील या सीसीटीव्हीमध्ये दिसतं आहे. या प्रकरणातील आरोपी तीन दिवसानंतरही फरार असल्यानं नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड पोलीस फरार विशाल सुर्यवंशीचा शोध घेत आहे. पण, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हर्षद खड्ड्यात काम करत होता, विशाल आला अन् गावठी कट्ट्यातून गोळी झाडली, बीडमधला खुनाचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल