TRENDING:

नाशकात मनसेसोबत युतीची घाई नडली, स्थानिक काँग्रेस नेत्यांना वरिष्ठांचा दट्ट्या, सपकाळ संतापले

Last Updated:

महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसेसह निवडणूक लढवणार असल्याची घोषणा काँग्रेस नेत्यांनी केली खरी पण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना काही तासांतच तोंडघशी पाडले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नसताना नाशिकमध्ये मनसेला सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुका लढण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ही भूमिका पक्ष शिस्तीचा भंग असल्याचे खडसावून सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत.
नाशिक काँग्रेस-मनसे युती
नाशिक काँग्रेस-मनसे युती
advertisement

हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेनंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नोटीस दिल्यास पक्षश्रेष्ठींचे समाधान होईल अशा स्वरूपाचे उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नाही तर आपल्यावर होणाऱ्या कारवाईची माहिती देण्यासाठी आपण स्वतः बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी राहुल दिवे यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर आता नाशिकमधील पदाधिकारी थेट बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला जात असल्याने काँग्रेसमध्ये दोन गट आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. नाशिक पदाधिकारी कारवाई प्रकरणावरून थोरात आणि सपकाळ असे दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

advertisement

नाशिक महापालिकेची संभाव्य गणिते जुळवली खरी पण स्थानिक नेते तोंडघशी

काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा मनसेसोबत युती करण्यास स्पष्ट विरोध असताना नाशिकच्या स्थानिक नेत्यांनी युती करणार असल्याची जाहीर घोषणा केली खरी परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांचे दावा खोडून काढत संबंधित बैठकीचा घोषणेचा आणि काँग्रेसचा संबंध नाही असे सांगत संबंधित नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

जे नेते बैठकीला उपस्थित त्यांच्याकडून खुलासा मागवणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, 7 लाख रुपयांची कमाई
सर्व पहा

मनसेसोबतच्या बैठकीला जे जे नेते उपस्थित होते, त्यांच्याकडे आम्ही खुलासा मागवणार आहोत. खुलाशानंतर काय कारवाई करायची, हे आम्ही पाहू, असे सपकाळ म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशकात मनसेसोबत युतीची घाई नडली, स्थानिक काँग्रेस नेत्यांना वरिष्ठांचा दट्ट्या, सपकाळ संतापले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल