TRENDING:

Thane Crime: ठाण्यात हायप्रोफाईल देह विक्री रॅकेटचा पर्दाफाश! मालिकांमधील अभिनेत्रींची सुटका, दलाल निघाली 'ही' वेबसिरीज स्टार

Last Updated:

Thane Sex Racket Actress Arrest : अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावण्याच्या स्वप्नाला पैशांच्या हव्यासाची जोड मिळाल्यावर काय होते, याचे विदारक चित्रण ठाण्यात समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावण्याच्या स्वप्नाला पैशांच्या हव्यासाची जोड मिळाल्यावर काय होते, याचे विदारक चित्रण ठाण्यात समोर आले आहे. महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेणाऱ्या एका २६ वर्षीय अभिनेत्रीला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या रॅकेटमधून पोलिसांनी ज्या दोन महिलांची सुटका केली, त्यातील एक हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे.
AI Image
AI Image
advertisement

>> पोलिसांनी असा रचला सापळा

ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली होती की, एक महिला जादा पैशांचे प्रलोभन दाखवून मुलींना देहविक्रयासाठी पुरवत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी 'बनावट ग्राहक' पाठवून या महिलेशी संपर्क साधला.

संबंधित महिलेने "आमच्याकडे हिंदी वेबसिरीज आणि टीव्ही मालिकांत काम करणाऱ्या मुली आहेत," असे सांगून काही फोटो पाठवले. व्यवहार ठरल्यानंतर ती दोन मुलींना घेऊन वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये आली. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून या महिला दलालाला रंगेहात पकडले.

advertisement

>> अभिनयाकडून सेक्स रॅकेटकडे का वळली?

तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. अटक केलेली २६ वर्षीय तरुणी स्वतः हिंदी वेबसिरीजमध्ये काम करते. ती मुंबईत भाड्याच्या घरात राहते. मालिका किंवा वेबसिरीजमध्ये नियमित काम मिळत नसल्याने आणि मिळणारे उत्पन्न घरखर्चासाठी अपुरे पडत असल्याने तिने हा मार्ग निवडला असल्याची माहिती समोर आली आहे. बहिणीचे शिक्षण आणि गावी असलेल्या आई-वडिलांना पैसे पाठवण्यासाठी, तसेच स्वतःच्या चैनीच्या सवयी पूर्ण करण्यासाठी ती एका व्यक्तीच्या संपर्कात आली आणि तिने हे रॅकेट चालवण्यास सुरुवात केली.

advertisement

>> पीडित महिला आणि पोलीस कारवाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

पोलिसांनी या कारवाईत ४० आणि ४८ वर्षे वयोगटातील दोन महिलांची सुटका केली आहे. आरोपी तरुणीला न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमागे अजून कोणाचे हात आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Crime: ठाण्यात हायप्रोफाईल देह विक्री रॅकेटचा पर्दाफाश! मालिकांमधील अभिनेत्रींची सुटका, दलाल निघाली 'ही' वेबसिरीज स्टार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल