TRENDING:

Baramati Loksabha : बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीला वेगळं वळण? दोन्ही पवार आले एकाच गाडीवर

Last Updated:

महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीतलं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. बारामतीमधल्या पवार कुटुंबातल्या लढाईकडे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोविंद वाकडे, प्रतिनिधी
बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीला वेगळं वळण? दोन्ही पवार आले एकाच गाडीवर
बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीला वेगळं वळण? दोन्ही पवार आले एकाच गाडीवर
advertisement

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीतलं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. बारामतीमधल्या पवार कुटुंबातल्या लढाईकडे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत असल्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांमधला संघर्ष टीपेला पोहोचला आहे. एकीकडे पवार कुटुंबात संघर्ष सुरू असतानाच पवार घराण्यातली पुढची पिढी मात्र एकत्र दिसली आहे.

advertisement

अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार आणि आमदार रोहित पवार एकाच गाडीवर पाहायला मिळाले आहेत. हिंजवडीच्या बगाड यात्रेत हे दोघं एकाच गाडीवर होते. बगाड यात्रेच्या गाडीवर पार्थ पवार आणि रोहित पवारांनी एकमेकांना सांभाळून घेत हास्यवदन केलं. या दोघांमध्ये फार संवाद झाला नसला तरी पवार कुटुंबातले दोघं एकत्र आल्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली.

advertisement

बगाड यात्रेनंतर रोहित पवार प्रचाराला

हिंजवडीमधल्या या बगाड यात्रेनंतर रोहित पवार मुळशीमध्ये महाविकासआघाडीच्या प्रचारासाठी गेले. तिथे त्यांनी अजित पवार आणि भाजपवर घणाघाती टीका केली. 'सत्तेत असताना शरद पवारांनी पैलवानांसाठी काम केलं. राजकीयदृष्ट्या पवार साहेब वस्ताद आहेत. वस्तादाने तयार केलेल्या पैलवानाला वाटतं की आपण एकट्याने तयार झालो आहोत. शेवटी वस्ताद एक डाव राखून ठेवतो. शेवटी वस्ताद एक डाव टाकतो आणि जिंकतो', असा टोला रोहित पवारांनी लगावला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

'भाजपला धूळ चारण्यासाठी पवार साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत. पवार साहेबांचं वय काढणारे फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. भाजपने त्यांना लोकल नेता बनवलं आहे,' असा निशाणाही रोहित पवारांनी अजित पवारांवर साधला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati Loksabha : बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीला वेगळं वळण? दोन्ही पवार आले एकाच गाडीवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल