मकाई गेट बंद असल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, बीबी का मकबऱ्याकडे ये-जा करण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे अतिरिक्त 3 किलोमीटरचा फेरा घालावा लागत होता. आता हा ताण कमी होणार आहे. वाहतूक लवकरात लवकर सुरू होण्यासाठी गेटच्या आतील भागातील काम प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. हे काम पूर्ण झालं असून आजपासून या गेटमधून वाहतूक सुरू केली जाणार आहे.
advertisement
Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा संकटाचे ढग, 48 तास धोक्याचे, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट
ऐतिहासिक ठेवा
मुघल बादशाह औरंगजेबाच्या आदेशानुसार 1682 मध्ये मकाई गेटची निर्मिती करण्यात आली होती. या दवाजाच्या दिशा मक्केकडे तोंड करून असल्याने त्याला मकाई गेट म्हटलं जातं. काळाच्या ओघात या गेटची पडझड सुरू झाली होती. त्यामुळे संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलं होतं. मकाई गेट उभारण्यासाठी ज्या साहित्याचा वापर करण्यात आला होता, त्याच साहित्यातून संवर्धन सुरू आहे. त्यामुळे या गेटला गतवैभव मिळणार आहे. राहुल दाशरथे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेटच्या संवर्धनाच्या कामात गूळ, बेल आणि नाचणीसारख्या साहित्यांचा वापर केला जात आहे.
पुरातत्व अभियंता रामेश्वर निपाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मकाई गेटच्या संवर्धनाचं काम जवळपास 50 टक्के पूर्ण झालं आहे. गेटच्या आतील भागाचं काम अगोदर पूर्ण करण्यात आलं आहे जेणेकरून वाहतूक सुरू होईल. शुक्रवारपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांना या गेटमधून जाता येईल. अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंदच राहील.