कोल्हापूर: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून हीट अँड रन्स प्रकरणाच्या घटना वारंवार घडत आहे. अशातच आता कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाला भरधाव कारने उडवलं. तरुणाला धडक दिल्यानंतर कारचालक फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहराजवळील उंचगाव या गावात ही घटना घडली. रोहित हप्पे असं या तरुणाचं नाव आहे. रोहित हा उचगावातला रहिवासी आहे. रात्री घराकडे परत येत होता. त्यावेळी पाठीमागून एक कार भरधाव वेगात आली.
advertisement
या कारने रोहितला जोराची धडक दिली. ही धडकी इतक्या जोरात होती की, रोहित दूरपर्यंत फेकला गेला. रोहितला धडक देऊन कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात वाहनधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
टेम्पोनं दूध उत्पादक शेतकऱ्याला चिरडलं
दरम्यान, मुंबईजवळील शहापूरमध्ये अपघाताची घटना घडली आहे. एका आयशर टेम्पोने दुध विक्रेत्याला चिरडलं आहे. शहापूर तालुक्यातील भातसा फाट्याजवळ हा अपघात झाला. मुंबई-नाशिक महामार्गावरून दुध विक्रेता शेतकरी पोपट बिन्नर (वय 52) मोटरसायकलने दूध घेऊन शहापूरच्या दिशेने विक्री करण्यासाठी जात होते. महामार्गावरील भातसा फाट्याजवळ भरधाव वेगाने म्हशीच्या पारडे घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोने दूध शेतकऱ्याला जोरदार धडक दिली. यामुळे दूध पोपट बिन्नर हे आयशर टेम्पोच्या चाकाखाली सापडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर आयशर टेम्पो हा सिन्नरहून म्हशीचे पारडे भरून तो मुंबईच्या दिशेने जात होता. आयशर टेम्पो खर्डी पोलीस ठाण्यात जमा केला असून पुढील तपास करीत आहेत.