TRENDING:

Solapur: नाद करतोय का? हॉटेल 7777 च्या मालकाला मॅनेजरला मारहाण भोवली, प्रकरणात पोलिसांची एंट्री

Last Updated:

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात 7777 नावाचं एक हॉटेल आहे. या हॉटेलचा मालक लखन हरिदास माने याने...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पंढरपूर : मागील काही दिवसांपासून हॉटेलवाल्यांना रिलस्टार व्हायचं चांगलंच फॅड लागलं आहे. पण सोलापूरमधील टेंभुर्णी येथील हॉटेल 7777 च्या मालकाला मुजोरगिरी चांगलीच भोवली आहे. आपल्याच एका कर्मचाऱ्याला नग्न करून मारहाण प्रकरणी अखेर या  मारकुट्या हाॅटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात 7777 नावाचं एक हॉटेल आहे. या हॉटेलचा मालक लखन हरिदास माने याने आपल्या कर्मचाऱ्याला नग्न करून पाईपने मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.  या व्हायरल व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी विषय लावून धरला. त्यानंतर या व्हिडीओची दखल घेत हॉटेल मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. हॉटेल मालकाला अटक झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

advertisement

काय आहे नेमकं प्रकरण?  

लखन हरिदास माने याच्या हॉटेल 7777 मध्ये हा प्रकार घडला होता. हा व्हिडीओ ४ महिने जुना असल्याचं सांगितलं जात आहे. हॉटेल 7777 मध्ये ज्या व्यक्तीला मारहाण झाली होती तो हॉटेलचा मॅनेजर होता. त्या दिवशी मॅनेजर हा दारूच्या नशेत हॉटेलमध्ये आला होता. त्यावेळी दारूच्या नशेत तो नग्न अवस्थेत आला होता. हे हॉटेलचे मालक लखन माने याने पाहिलं. त्यानंतर या मॅनेजरला सगळ्यासमोर नग्न करून लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यावेळी हॉटेलचा स्टापही यामध्ये सहभागी झाला होता, अशी माहिती खुद्द मॅनेजरने दिली होती.

advertisement

लखन माने आणि मॅनेजरचा व्हिडीओ आला समोर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांदा आणि मक्याची आज काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेल मालक लखन मानेला जाग आली. त्याने ज्या मॅनेजरला मारहाण केली होती, त्याला सोबत घेऊन एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओमध्ये मॅनेजर म्हणतो की, 'मी ड्रिंक करून आलो होतो, मी नग्न अवस्थेत होतो. मालकांनी मला पाहिल्यावर त्यांनी मला मारलं' असं मॅनेजरने सांगतोय. एवढंच नाहीतर मॅनेजरला मारहाण केल्यानंतर लखन माने याने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवरच  कायद्याच्या मार्फत मी कारवाई करणार, असा इशाराही दिला होता. पण, आता पोलिसांनी या मारकुट्या हॉटेल मालकाला अटक केली असून कायद्याचा चांगलाच इंगा दाखवला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: नाद करतोय का? हॉटेल 7777 च्या मालकाला मॅनेजरला मारहाण भोवली, प्रकरणात पोलिसांची एंट्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल