हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके शनिवारी बिस्लेरीचा ट्रक घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते.यानंतर आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी आंदोलन करताना मोठी घोषणा केली. जो पर्यंत आमचे मराठी बांधव खंबीरपणे उभे आहेत,तो पर्यंत जे कमी पडेल ते आम्ही पुरवणार. तसेच आम्ही सहा दिवस हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.जोपर्यंत जरांगे उठत नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवणार असल्याची घोषणा नागेश मडके यांनी केली आहे.यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
advertisement
नाद करती काय,यायला लागतंय अशा आशयाची रिल्स तुम्ही तुमच्या इस्टाग्राम फिडवर नक्कीच पाहिली असेल. या सोशल मीडियावर फेमस असलेल्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी मराठा आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.नागेश मडके यांनी ट्रकभरून बिस्लेरी पाण्याच्या बॉटल मुंबईच्या दिशेने पाठवल्या आहेत.या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये ते नेमकं काय म्हणालेत? ते पाहूयात.
मराठायोद्धा या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये धाराशीव मधून हत्ती घेऊन मराठा बांधवासाठी मुंबईच्या दिशेने निघालो आहे. बिस्लेरीच्या पाण्यांच्या बॉटलने भरलेला हत्ती घेऊन निघालो आहे.आमच्या भावाला फोन लावून थेट बिस्लेरीच्या बॉटल्सनी हत्तीच भरायला लावला आहे.त्यामुळे नागेश मडकेंने धाराशीवमधून मुंबईत मराठा बांधवांसाठी पाणी पाठवत आहेत.
या व्हिडिओत नागेश मडके म्हणतात की, तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे.मनोज दादा जोपर्यंत आपल्याला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून उठू नका. जितकी आपल्याला कमी पडेल तितकं आम्ही आणून द्यायला तयार आहोत,असे देखील त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान सकल मराठा समाजाकडून हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे खुप आभार मानले आहेत. आणि या मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.