TRENDING:

अशोक खरातच्या ऑफिसमध्ये व्हिडीओ कसे व्हायरल झाले? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी पडद्यामागची खरी गोष्ट सांगितली!

Last Updated:

अशोक खरातला अटक करण्यात आली, तेव्हा काही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले होते. पण, त्यातील कोणतेच व्हिडीओ

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मीडिया आणि माध्यमांवर अशोक खरातचे रोज नवे नवे व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज्य सरकारने कडक पाऊल उचललं असलं तरीही व्हिडीओ समोर येतच आहे. पण, हे व्हिडीओ कुणी आणि का व्हायरल केले, पोलिसांकडून कुठे चूक झाली का? याबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली.
advertisement

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी अशोक खरातच्या अटकेपासून ते त्याच्या प्रकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. "अशोक खरातला अटक करण्यात आली, तेव्हा काही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले होते. पण, त्यातील कोणतेच व्हिडीओ हे बाहेर गेले नाही. अशोक खरातचा ऑफिस बॉय होता, त्याने काही व्हिडीओ स्वत:कडे ठेवले होते. हे व्हिडीओ त्याने व्हायरल केले, अशी माहिती कर्णिक यांनी दिली.

advertisement

ऑफिस बॉयच्या पत्नीशी अशोक खरातचे कृत्य

तसंच, अशोक खरातचा हा ऑफिस बॉयच्या ७ महिने गरोदर असलेल्या बायकोसोबत अशोक खरातने अश्लिल कृत्य केले होते. त्यामुळे या ऑफिस बॉयने अशोक खरातचा प्रकरण उघडकीस आणलं. त्याने काही व्हिडीओ रेकॉर्ड केले, ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. आपल्या जिवाला काही बर वाईट झालं तर हे व्हिडीओ बाहेर आणावे असं त्याने सांगून ठेवलं होतं. त्यांनी देखील इतरांकडे व्हिडीओ ठेवले होते.  यातून हे व्हिडीओ बाहेर आले, असं कर्णिक यांनी सांगितलं.

advertisement

तसंच, अशोक खरातच्या भीतीने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी हे व्हिडीओ ठेवले होते. जवळपास ६५ ट्वीटर अकाऊंट, फेसबुक, इन्साटाग्राम पेजवर गुन्हे दाखल केले आहे. काही व्हिडीओ हे मार्फ केले आहेते. त्यांच्यावरही कारवाई केली आहे. खरातकडे राज्यभरातून आणि राज्याबाहेरून सुद्धा माणसं येत होती. त्यामुळे व्हिडीओची संख्याही खूप जास्त असल्याचं कर्णिक यांनी सांगितलं.

अशोक खरातला कसं पकडलं? 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

अशोक खरातचे राजकीय संबंध आणि त्याचा मोठा भक्तपरिवार पाहता कारवाईची माहिती लीक होण्याची दाट शक्यता होती. जर माहिती बाहेर आली असती, तर तो पसार झाला असता किंवा यंत्रणेवर दबाव आणला गेला असता. त्यामुळेच, या संपूर्ण मोहिमेची माहिती राज्यातील केवळ पाच व्यक्तींना होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि नाशिक पोलीस दलातील केवळ तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. कारवाई करतानाही आरोपीचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते, नाशिक पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि नाशिक पोलीस दलातील आणखी एक कर्मचारी यांनाच फक्त याविषयी माहिती होती, असे संदीप कर्णिक म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरातच्या ऑफिसमध्ये व्हिडीओ कसे व्हायरल झाले? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी पडद्यामागची खरी गोष्ट सांगितली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल