अल्पसंख्याक मंत्रालयाची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्या दिवशी अपघाती निधन झाले, त्याच दिवशी अल्पसंख्याक खात्याशी संबंधित अनेक फाईली मंत्रालयात मंजूर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासकीय दुखवटा काळात अल्पसंख्याक विभागाने ७५ शाळा तथा संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला. याच प्रकरणात वरिष्ठ सनदी अधिकारी मिलिंद शेनॉय रडारवर आले होते.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा प्रकार गंभीर्याने घेतलेला होता तसेच तातडीने चौकशीचे आदेश दिलेले होते. दोषी अधिकाऱ्यांवर लगोलग कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केलेल्या होत्या. त्याचसंदर्भात पहिले पाऊन म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिलिंद शेनॉय यांची बदली केली.
मिलिंद शेनॉय यांच्याबरोबर कोण कोण अधिकारी सहभागी?
अल्पसंख्याक खात्याकडून झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात शेनॉय यांच्याबरोबर विभागातील आणखी कोण कोण अधिकारी यामध्ये सहभागी आहेत, हे देखील समोर येण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कोण आहेत आयएएस मिलिंद शेनॉय?
मिलिंद शेनॉय ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत.
मिलिंद शेनॉय अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पीय शिफारशींबाबत झालेल्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकींमध्ये मिलिंद शेनॉय सहभागी होते.
