आल्याच्या आवकेत चढ-उतार
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1741 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 367 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4353 ते 6353 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल आल्यास 9000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! उन्हाचा पारा वाढणार; हवामान खात्याचा अलर्ट
advertisement
केळीची आवक दबावात
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 399 क्विंटल केळीची आवक राहिली. यापैकी नाशिक बाजारात आवक झालेल्या 330 क्विंटल केळीस 900 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 66 क्विंटल केळीस प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
डाळिंबाची आवक कमी
आज राज्याच्या मार्केटमध्ये 2740 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 1546 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 16000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल डाळिंबास 16000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.





