TRENDING:

IAS Transferred: राज्य सरकारकडून IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका, 8 बड्या अधिकाऱ्यांच्या जागा बदलल्या

Last Updated:

आता पुन्हा एकदा राज्य सरकारने ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यामध्ये जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचा समावेश आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. अशोक खरात याचे काही शासकीय अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचं उघड झालं आहे. दोनच दिवसांपूर्वी अभिजीत भांडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारने ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यामध्ये जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचा समावेश आहे.
News18
News18
advertisement

राज्य सरकारने आयपीएस  अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडाका लावला आहे.  दिनांक २७ मार्च २०२६ रोजी बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या रुबल प्रखेर अग्रवाल  यांची मुंबईतच  कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

पुणे महिला आणि बाल आयुक्त नयना गुंडे (IAS:SCS:2008)  यांची  अमरावतीच्या अमरावती विभागात बदली करण्यात आली आहे.

advertisement

अमरावतीच्या विभागीय आयुक्त असलेल्या श्वेता सिंघल (IAS:RR:2009) यांची आता व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून बदली झाली आहे.

सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे (IAS:SCS:2010)  यांची   व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून बदली करण्यात आली आहे आहे.

तर धाराशिवच्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या  डॉ. मैनक घोष (IAS:RR:2019) यांची सांगली इथं जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

advertisement

प्रियंवदा म्हाड्डळकर (IAS:RR:2022) यांची जिल्हा परिषद, धाराशिव इथं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल रेखवार (IAS:RR:2011) यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबईत सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

एम. देवेंद्र सिंग (IAS:RR:2011) यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: राज्य सरकारकडून IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका, 8 बड्या अधिकाऱ्यांच्या जागा बदलल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल