उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी केल्याचा पराक्रम केला. एवढंच नाहीतर मुद्रांक शुल्क फक्त 500 रुपये भरला होता. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली. अखेरीस हा व्यवहार आता रद्द झाला आहे. या प्रकरणावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे.
advertisement
पार्थ पवार दोषी सापडले तर कारवाई होईल का?
असं आहे की, आता तुम्ही अहवाल समोर येऊल द्या, अहवालामध्ये जो कुणी दोषी असेल माझ्या विधानाशी उपमुख्यमंत्री अजित पवार सहमत असेल. या अहवालामध्ये कुणीही दोषी आढळलं तर कारवाई केली जाईल. काल आम्ही अजिबात वेळ न पाहता, चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे सरकारला कुणालाही मागे घालायचं नाही, कुणालाही लपवायचं नाही. अशा प्रकार जर कुणी चुकीचं काम करत असेल तर त्यांना मागे घालणार नाही, असा इशाराह फडणवीस यांनी दिला.
' हा जो काही करार केला होता, पैशांचं देवाणघेवाण बाकी होतं. पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती. पण आता दोन्ही पक्षाने अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. व्यवहार रद्द करायचा असेल तर रजिस्ट्रीचे पैसे भरावे लागणार आहे. पण हे जरी होणार असेल तरी गुन्हा दाखल झाला आहे, फौजदारी गुन्हे मागे होणार नाही. यामध्ये जो कुणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही एक समिती सुद्धा स्थापन केली आहे, ती समिती सगळी चौकशी करेल. महिन्याभरात अहवाल दिला जाईल. या प्रकरणी व्यापती किती आहे, या प्रकरणात कोण कोण आहे, याची माहिती समोर आल्यानंतर कारवाई केली जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
'असं आहे की, या प्रकरणात कारवाई केली आहे. दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. ही जी काही घटनाक्रम समोर येत आहे. तळाला जाण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. संपूर्ण माहिती समोर येईल, सगळी माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणावर अधिकाधिक बोलणे योग्य ठरेल, असंही फडणवीस म्हणाले.
अभय दिला आहे, बाकीच्यांवर गुन्हे दाखल केले, पार्थवर का नाही? असं विरोधक म्हणत आहे ,असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, "ज्यांना एफआयआर काय असतो ,समजत नाही. अशीच लोक बोलत आहे. एफआयआर जेव्हा दाखल केला जात असतो. त्यावेळी जे पक्ष असतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असतात. जी कंपनी आहे, त्यामध्ये जे सही करणारे आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असतात. या प्रकरणात ज्यांनी सही केली, ज्यांनी विक्री केली ते. ज्यांची चुकीची विक्री केली. ज्यांनी फेरफार केला, त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. आणखी काही नावं समोर येतील, संबंध आला, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आता जो एफआयआर दाखल केला आहे त्यांच्यामध्ये ज्यांनी सही केली, जे सहीसाठी जबाबदार आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे", असं फडणवीस म्हणाले.
'मुद्रांक शुल्क भरावेच लागणार'
तसंच, 'मुद्रांक शुल्क भरण्याबाबत जी नोटीस देण्यात आली आहे, ती संबंधितांना देण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कोणताही व्यवहार रद्द होत नाही. हा नियम आहे, आणि तो नियम येथेही काटेकोरपणे पाळला जाईल' असंही त्यांनी स्पष्ट केलं.
