मक्याचे दर गडगडले
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 14 हजार 716 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 3 हजार 075 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1055 ते जास्तीत जास्त 1880 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2400 ते 2600 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक मात्र भाव दबावातच
राज्याच्या मार्केटमध्ये आज 1 लाख 80 हजार 245 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 06 हजार 424 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 405 ते जास्तीत जास्त 2062 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच ठाणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल कांद्यास सर्वाधिक 4500 रुपये बाजारभाव मिळाला.
वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला उच्चांकी भाव
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 19 हजार 844 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 18 हजार 876 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3793 ते 4577 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये 5 हजार 450 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 6500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
बहुतांश शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केल्यानंतर पणन मंडळाकडून हमीभावावर खरेदी केंद्रे सुरु करण्यात येत आहेत. यामुळे येत्या 15 नोव्हेंबर पासून बाजारातील तेजीचा लाभ व्यापारीच लाटण्याची शक्यता अधिक आहे. शेतकऱ्यांकडून अल्प दरात शेतमाल लुटून झाल्यावर खरेदी केंद्रे सुरु करण्याचा शासन निर्णय म्हणजे वरातीमागून घोडेअसे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.





