TRENDING:

पती डॉ. निलेश जेजुरकरला जेल की बेल? नाशिकच्या डॉ.मनीषा जेजुरकर प्रकणाबाबत महत्वाची अपडेट

Last Updated:

Dr.Manisha Jejurkar Case : इतरांच्या मानसिक समस्यांवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद आता समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : इतरांच्या मानसिक समस्यांवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद आता समोर आला आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.निलेश जेजुरकर सध्या पोलिसांना सापडत नसून अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सोमवारी (१६ मार्च) सुनावणी होणार आहे.
Dr.Manisha Jejurkar Case
Dr.Manisha Jejurkar Case
advertisement

आयुर्वेद तज्ज्ञ पत्नीची आत्महत्या

गंगापूर रोड परिसरातील डी. के. नगरमधील ‘रेवती ब्लू’ या घरात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात त्यांच्या बहिणी प्रा. रोहिणी थोरात यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, २०२१ पासून डॉ. निलेश जेजुरकर यांनी पत्नी मनीषा यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. घरातील साध्या निर्णयांसाठीही ते रुग्णालयातील एका वरिष्ठ महिला डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे सांगितले जाते. यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

advertisement

आरोपी डॉक्टर फरार

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. जेजुरकर सध्या बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. गंगापूर पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली असून तांत्रिक तपासाच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील त्यांच्या कार्यकाळाबाबतही विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. तपासाचा विस्तार झाल्यास आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (१६ मार्च) सुनावणी होणार आहे. तोपर्यंत डॉ. जेजुरकर पोलिसांना शरण येतात की न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल आहिरराव करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पती डॉ. निलेश जेजुरकरला जेल की बेल? नाशिकच्या डॉ.मनीषा जेजुरकर प्रकणाबाबत महत्वाची अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल