TRENDING:

दुकानासमोर एकाने ठेवली बॉम्बसदृश पिशवी, सर्वांची धावपळ....अखेर सत्य आलं समोर

Last Updated:

चंद्रपूरच्या गडचांदूर शहरातून एक वेगळीच घटना समोर आली. एका इसमाने बॉम्बसदृश पिशवी एका दुकानासमोर ठेवली. त्यामुळे सर्वांची धावपळ झाली. परंतु, शेवटी ही वस्तू बॉम्ब आहे की नाही याची शहानिशा बॉम्ब शोधक पथकाने केली, आणि सत्य समोर आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हैदर शेख, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

गडचांदूर, चंद्रपूर:  चंद्रपूरच्या गडचांदूर शहरातून एक वेगळीच घटना समोर आली. एका इसमाने बॉम्बसदृश पिशवी एका दुकानासमोर ठेवली. त्यामुळे सर्वांची धावपळ झाली. परंतु, शेवटी ही वस्तू बॉम्ब आहे की नाही याची शहानिशा बॉम्ब शोधक पथकाने केली, आणि सत्य समोर आलं. बॉम्ब शोधक पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.

तो बॉम्ब नव्हताच;

advertisement

गडचांदूर शहरातील भगवती एनएक्स या दुकानातून मिळालेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्ब नसल्याचं अखेर निष्पन्न झालं आहे. लोखंडी पाईप, घड्याळ, बॅटरी आणि वायर एका पिशवीत ठेवून आरोपींनी बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचा बनाव केल्याचं उघड झालं आहे. गडचांदूर पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची कसून चौकशी सुरू, मात्र बॉम्ब असल्याची शंका खोटी ठरल्याने जवळपास 8 तास तासांनंतर पोलीस आणि गडचांदूर शहरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

advertisement

घटनाक्रम:

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवणारा इसम सीसीटीव्हीत कैद झाला. शहरातील व्यापार पेठेतल्या भगवती एन एक्स या कापड दुकानात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवताना विशीतील एक युवक कैद झाला. दुकानाच्या समोरच्या भागात ही वस्तू ठेवून त्याने बाहेरूनच पलायन केले. यानंतर दुपारनंतर अज्ञात व्यक्तीने दुकानात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. चंद्रपूरच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने या बॉम्बसदृश्य वस्तूची तपासणी करण्यास सुरूवात केली. मात्र अखेरीस ती वस्तू बॉम्ब नसल्याचं निष्पन्न झालं

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दुकानासमोर एकाने ठेवली बॉम्बसदृश पिशवी, सर्वांची धावपळ....अखेर सत्य आलं समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल