TRENDING:

हर्षवर्धन पाटलांचा गेम, पवारांना धक्का, इंदापूरचा जायंट किलर नेता भाजपात जाणार, पक्षप्रवेश कधी?

Last Updated:

इंदापूर विधानसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नेता भाजपात प्रवेश करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इंदापूर: विधानसभा निवडणुकीत इंदापूरची निवडणूक प्रचंड गाजली होती. याचं कारण म्हणजे ऐनवेळी इथं पार पडलेली तिरंगी निवडणूक. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांचा विजय पक्का मानला जात होता. अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे सहज हरतील, असा अंदाज वर्तवला जात होता.
News18
News18
advertisement

मात्र त्यावेळी इंदापूर येथील राष्ट्रवादीचे नेते आणि उद्योजक प्रवीण माने निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन अपक्ष फॉर्म भरला. या तिरंगी निवडणुकीत त्यांना विजय मिळवता आला नाही. मात्र प्रवीण माने जायंट किलर ठरले होते. हर्षवर्धन पाटलांची मतं आपल्या बाजुने वळवण्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं होतं. परिणामी हर्षवर्धन पाटील यांना सहज सोपा वाटणारा विजय अवघड झाला. आणि निवडणुकीत ते पराभूत झाले.

advertisement

इंदापूरच्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले प्रवीण माने आता भाजपच्या वाटेवर आहेत. २ जुलै रोजी त्यांचा भाजपात अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपला इंदापुरात तगडा चेहरा हवा होता. आता प्रवीण माने यांच्या रूपाने भाजपची ही इच्छा पूर्ण होणार आहे. प्रवीण माने हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. यातूच त्यांचा भाजपात प्रवेश होत असल्याचं सांगितलं जात आहे.

advertisement

लोकसभा निवडणुकीत देखील प्रवीण माने यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. प्रवीण माने यांनी लोकसभेत सुरुवातीला सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला होता. मात्र ऐनवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मानेंच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली होती. त्यांना आपल्या बाजुने वळवून घेतलं होतं. पुढे त्यांनी महायुतीचं काम केलं. पण त्यांना इंदापूरमधून अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांना लीड मिळवून देता आलं नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हर्षवर्धन पाटलांचा गेम, पवारांना धक्का, इंदापूरचा जायंट किलर नेता भाजपात जाणार, पक्षप्रवेश कधी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल