TRENDING:

नगरपालिकेवेळी एकमेकांच्या गळ्यात गळे, आता ZP निवडणुकीला एकमेकांसमोर उभे ठाकले, इंदापुरातला पॅटर्नच वेगळाय!

Last Updated:

Pune ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत इंदापुरात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, आता इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच मुख्य लढत होणार आहे.
इंदापूर जिल्हा परिषद निवडणूक
इंदापूर जिल्हा परिषद निवडणूक
advertisement

नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर आणि भाजपचे प्रवीण माने यांनी कृष्णा-भीमा विकास आघाडीचा एक नवीन प्रयोग करून निवडणूक लढवली होती. परंतु या प्रयोगात त्यांना अपयश आले. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र झाल्याने राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असल्याने आता प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हेच भाजपचे नेतृत्व करीत आहेत.

advertisement

इंदापुरात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच होणार आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगर परिषदेत एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे नेते आता जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणार आहे.

अजित पवार विरुद्ध भाजप अशीच पुणे जिल्ह्यात लढत

advertisement

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकसंध राष्ट्रवादीचा अनेक ठिकाणी प्रभाव होता. मागील अनेक वर्षांपासून अजित पवार यांनीच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळल्याने निधी देवघेवीच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचे संघटन मजबूत केले. ग्रामीण भागातील अनेक तरुणांना त्यांनी सक्रिय राजकारणात आणले. परंतु राज्यात सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने ठरवून पुणे जिल्ह्यातील अजित पवार यांच्या वर्चस्वाला दणके द्यायला सुरुवात केली आहे. आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीत जोरदार संघर्ष रंगणार आहे.

advertisement

पुणे जिल्हा परिषदेत कोणाचे वर्चस्व? सध्याची परिस्थिती काय आहे?

पुणे जिल्हा परिषदेत सध्या सत्ता संतुलनाची स्थिती दिसून येते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा पारंपरिक प्रभाव अजूनही अनेक भागांत जाणवतो. तर दुसरीकडे भाजपने गेल्या काही वर्षांत संघटन मजबूत करत आपली पकड वाढवली आहे. ग्रामीण भागातील विकासकामे, निधीवाटप आणि प्रशासकीय निर्णयांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत.

advertisement

पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण जागा, पक्षीय बलाबल कसे आहे? (७५ जागा)

राष्ट्रवादी-४४

शिवसेना-१३

काँग्रेस-०७

भाजप--०७

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांच्या पूजाच्या मागे लागला साप? 3 महिन्यात 7 वेळा केला दंश, जालन्यातील...
सर्व पहा

इतर-०४

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगरपालिकेवेळी एकमेकांच्या गळ्यात गळे, आता ZP निवडणुकीला एकमेकांसमोर उभे ठाकले, इंदापुरातला पॅटर्नच वेगळाय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल