मांडकीतील गोपाळपूर येथील निवासी मतिमंद विद्यालयात 6 ते 18 वयोगटातील मुले येथे राहत असतात. 2018 आणि जुलै 2025 केअर टेकर यांनी मुलांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळातील अधिकाऱ्यांनी चौकशी करून सदर बाबत फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे चिखलठाणा पोलीस ठाण्यामध्ये सदर चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी अध्यक्ष सखाराम सुभानराव पौळ यांनी फिर्याद दिल्यावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
निवासी मतिमंद विद्यालयात इतर विद्यार्थ्यांनाही अत्याचाराला सामोरं जावे लागत असल्याचे समोर आले आहे. विद्यालयातील केअरटेकर प्रदीप देहाडे याने देखील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचं आरोप करण्यात आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात संबंधितांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.