तुषार तायडे असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या निधनानंतर नातेवाईक आणि कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. आरोपींनी निर्दयीपणे केलेल्या मारहाणीमुळेच तुषारचा बळी गेला, असा आरोप करत नातेवाईकांनी केल्याने रुग्णालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
सध्या जळगाव जिल्हा रुग्णालयात तणावाचं वातावरण असून तुषारच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना त्वरित अटक होत नाही, तोपर्यंत तुषारचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
advertisement
यावल पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मारहाणीत सात ते आठ लोक सहभागी असल्याने पोलिसांनी उर्वरित आरोपींचाही कसून शोध घेत आहेत.
जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्व आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले जात आहे. सोशल मीडियावरील किरकोळ वादामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
