28 जानेवारीला अजित पवारांचा झालेला अपघात ते सुनेत्रा पवारांनी 26 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीच्या कालवधीदरम्यान पक्षाकडून जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलाय तो ग्राह्य धरू नये असं सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला पाठवलेल्या पत्रात नमूद केलं. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला 10 मार्चला पाठवलेल्या पत्राला किनार आहे ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राची... या पत्रात पक्षाच्या घटनेत बदल करून पक्षाचे सर्व अधिकार प्रफुल्ल पटेलांना देण्यात आल्याचं म्हटल्याचं बोललं जातंय. या पत्रावरून राष्ट्रवादीत मतभेद असल्याचं बोललं जातंय. मात्र या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या पत्रावरून राष्ट्रवादीत वादळ आलंय ते निवडणूक आयोगाला पाठवलेलं हे पत्र कसं बाहेर आलं?याची आता चौकशी केली जाणार आहे,
advertisement
पत्र बाहेर कोणी दिले? चौकशी केली जाणार
सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला निवडणूक पाठवलेल्या पत्रात जी कार्यकारिणी आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, माणिकराव कोकाटे,शेखर निकम,सुबोध मोहिते,शिवाजीराव गर्जे,सरोज अहिरे,सना मलिक,जय अजित पवार,धीरज शर्मा यांच्या नावाचा उल्लेख आहे. राष्ट्रवादीच्या या कार्यकारिणीत जुन्या ऐवजी तरुण चेहऱ्यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीतून तटकरे आणि पटेलांच्या समर्थकांना कात्रजचा घाट दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. आमदार रोहीत पवार यांना 10 मार्च 2026 ला निवडणूक आयोगाला दिलेले पत्र हे बाहेर कोणी दिले याची चौकशी केली जाणार आहे. या आधीच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती सtत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदाची चर्चा सुरू
निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या या पत्रांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदाची चर्चा सुरू झाली. आता ही मतभेदांची दरी रुंदावणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
