याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा पालकर नावाच्या महिलेने 'ज्यू पीडिया' नावाच्या कंपनीचं कार्यालय थाटलं होतं. या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन टास्कमध्ये गुंतवणूक करा आणि लाखो रुपये कमवा अशी जाहिरात करण्यात आली. या कंपनीच्या ऑनलाईन ग्रुपमध्ये लिली आणि जॅक अशी दोन नावे दिसत होती. ऑनलाईन टास्कच्या 9 लेव्हल पूर्ण केल्यानंतर लाखोंचा फायदा होईल, असं आमिष अनेक गरजवंतांना दाखवलं गेलं.
advertisement
Water Supply: कल्याण एमआयडीसीत लागणार पाणीबाणी! बारवी धरणातील पाणी 24 तासांसाठी बंद, कारण काय?
सुरुवातीला कंपनीने प्रत्येक गुंतवणूकदाराचं वॉलेट तयार केलं. या वॉलेटमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेले पैसे आणि टास्क पूर्ण केल्यानंतर मिळालेला मोबदला दिसत होता. मात्र, अनेक महिने उलटून गेल्यानंतर हे पैसे काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता कंपनीकडून त्यांना उडवा उडवीची उत्तरं मिळाली. अखेर गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचं लक्ष्यात आलं. त्यांनी कथित सीईओ सुषमा पालकरला गाठलं मात्र तिनेही उडवा उडवीची उत्तरं दिली.
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी थेट कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी गर्दी केली याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.