Water Supply: कल्याण एमआयडीसीत लागणार पाणीबाणी! बारवी धरणातील पाणी 24 तासांसाठी बंद, कारण काय?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Water Supply: बारवी धरणातून येणारं पाणी अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ गावाजवळ एमआयडीसी घेते.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणच्या एमआयडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 18 ते 19 सप्टेंबर (गुरुवार आणि शुक्रवार) रोजी बारवी जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम करणार आहे. त्यामुळे उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पाणीपुरवठा बंद राहील. याशिवाय, अंबरनाथ, बदलापूर ग्रामीण भागातील गावांना होणारा पाणीपुरवठा गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 या कालावधीत बंद राहील.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सिव्हिव इंजिनिअरनी याबाबत माहिती आहे. या माहितीनुसार, बारवी धरणातून येणारं पाणी अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ गावाजवळ एमआयडीसी घेते. तिथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून बदलापूर, अंबरनाथ निवासी, औद्योगिक क्षेत्र, कल्याण, डोंबिवली पालिका, नवी मुंबई, तळोजा औद्योगिक क्षेत्र, ठाणे, कळवा व मुंब्रा परिसराला वितरित केलं जातं. जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा काही काळासाठी खंडीत होईल.
advertisement
संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका, गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा, असं आवाहन एमआयडीसीने केलं आहे. 18 ते 19 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि त्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असं आवाहन प्रशासनाने देखील केलं आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
September 13, 2025 10:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Water Supply: कल्याण एमआयडीसीत लागणार पाणीबाणी! बारवी धरणातील पाणी 24 तासांसाठी बंद, कारण काय?