TRENDING:

चौथी मुलगीच, पित्याने डोक्यात पाट घालून केली हत्या, जळगावमधील अमानुष घटना

Last Updated:

जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात मोराळ येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इथं एका पित्याने आपल्या तीन दिवसांच्या नवजात बाळाची निर्घृण हत्या केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात मोराळ येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तीन मुलींनंतर चौथीही मुलगीच झाली या रागातून एका पित्याने केवळ तीन दिवसांच्या नवजात मुलीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं मुलीच्या डोक्यात लाकडी पाट घालून तिची हत्या केली.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मोराळ येथील रहिवासी कृष्णा लालचंद राठोड आणि राधिका राठोड यांना आधीच तीन मुली होत्या. त्यांना मुलगा होईल अशी आशा होती. मात्र, १३ डिसेंबर रोजी राधिका यांनी चौथ्या मुलीला जन्म दिला. मुलगा होईल ही अपेक्षा फोल ठरल्याने कृष्णा राठोड संतापला होता. रागाच्या भरात त्याने घरातील लाकडी पाट उचलला आणि अवघ्या तीन दिवसांच्या निष्पाप जीवाच्या डोक्यात घातला. या भीषण हल्ल्यात चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

अपघाताचा बनाव रचला, पण...

आपला गुन्हा लपवण्यासाठी राठोड कुटुंबाने या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. "बाळ आईच्या हातातून चुकून पडले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला," असा बनाव त्यांनी रचला होता. सुरुवातीला सर्वांना हे अपघाती निधन वाटले, मात्र गावकऱ्यांमध्ये या मृत्यूबाबत कुजबुज सुरू होती. काही गावकऱ्यांनी पोलिसांकडे संशय व्यक्त केला, ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.

advertisement

वैद्यकीय अहवालाने उघडले पित्याचे बिंग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
सर्व पहा

जामनेर पोलिसांनी संशयावरून कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले. जबाबातील विसंगती आणि जळगाव येथील फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामुळे पोलिसांचा संशय बळावला. वैद्यकीय अहवालात बाळाच्या डोक्याला बसलेली इजा ही उंचावरून पडल्याने नसून एखाद्या जड वस्तूने प्रहार केल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच पित्याचा बनाव उघड पडला आणि त्याने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. एका जन्मदात्या बापानेच पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चौथी मुलगीच, पित्याने डोक्यात पाट घालून केली हत्या, जळगावमधील अमानुष घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल