TRENDING:

घरी 93 एकर शेती, एक कोटी खंडणी द्यायला तयार, तरी असंख्य वार करत घाटात फेकलं, संभाजीनगरमध्ये भयंकर हत्या!

Last Updated:

जालना जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे पाटील यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी एक कोटीच्या खंडणीसाठी त्यांचं अपहरण केलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे पाटील यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी एक कोटीच्या खंडणीसाठी त्यांचं अपहरण केलं होतं. आरोपींनी गव्हाणे यांच्या कुटुंबीयांकडे तशी मागणी देखील केली होती. पण नंतर अपहरणकर्त्यांनी गव्हाणे यांची निर्घृण हत्या करत. त्यांचा मृतदेह कन्नडच्या घाटात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे अपहरण झालेल्या शेतकऱ्याचा परिचित सचिन बनकर यानेच हा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

सचिन बनकर (रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), अजिनाथ ऊर्फ अजय सपकाळ (रा. पालोद), वैभव रानगोते (रा. गोळेगाव), विशाल खरात (पानवडोद, ता. सिल्लोड) आणि दीपक जाधव (रा. लिहाखेडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. अपहरण आणि हत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. मयत गव्हाणे यांच्याकडे ९३ एकर शेती आहे. तसेच ते भुसार मालाचे मोठे व्यापारी होते.

advertisement

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे पाटील हे शनिवारी सायंकाळी मक्याचे पैसे घेण्यासाठी उंडणगाव येथील व्यापारी मुकेश पंडित यांच्याकडे गेले होते. व्यापाऱ्याकडून १ लाख रुपये घेऊन ते दुचाकीने घरी जात होते. सायंकाळी ७ वाजता पाचही संशयितांनी त्यांचं कारमधून अपहरण केले. त्यांना छत्रपती संभाजीनगर परिसरात आणलं आणि विविध ठिकाणी फिरवलं.

advertisement

अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी अपहरणकर्त्यांनी या शेतकऱ्याच्याच फोनवरून त्याच्या कुटुंबीयांना फोन केला. त्यांच्याकडे एक कोटींच्या खंडणीची मागणी केली. वडिलांना जिवंत बघायचं असेल तर १ कोटी घेऊन ये, अशी धमकी आरोपींनी पीडित शेतकऱ्याच्या मुलाला दिली. त्या प्रकारे मुलगा एक कोटी रुपये घेऊन आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी गेला. पण आरोपी सातत्याने लोकेशन बदलत राहिले. त्यांनी आधी संभाजीनगर बसस्टॉप, मग सेंट्रल नाका, कलेक्टर ऑफिस, टीव्ही सेंटर, आंबेडकर चौक, बाबा पेट्रोल पंप, अशा विविध ठिकाणी यायला सांगितलं. त्यानुसार पीडित शेतकऱ्याचा मुलगा एक कोटी रुपये घेऊन संबंधित ठिकाणी गेला.

advertisement

१ कोटी द्यायला तयार तरीही आरोपींनी केली हत्या

मात्र आरोपी शेवटी आम्हाला पैसे नको आहेत, असं म्हणत फोन कट केला. यानंतर आरोपींनी असंख्य वार करत गव्हाणे यांना संपवलं. रक्ताने माखलेला त्यांचा मृतदेह आरोपींनी कन्नडच्या घाटात फेकून दिला. आरोपी हे मयताच्या परिचयाचे होते. गव्हाणे यांना जीवंत सोडलं तर आपलं बिंग फुटेल, या भीतीने आरोपींनी गव्हाणेंची हत्या केली. याप्रकरणी ४ अपहरणकर्त्यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कारसह अटक केली, तर अन्य एका संशयिताला लिहाखेडी इथून ताब्यात घेतलं.

advertisement

डंप डेटा वापरून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढला सोयाबीनचा भाव, तूर आणि कापसाची स्थिती काय?
सर्व पहा

आरोपी वारंवार लोकेशन बदलत असल्याने त्यांचे मोबाइल लोकेशन काढणे पोलिसांना कठीण जात होते. मात्र, आरोपी गव्हाणे पाटील यांच्याच नंबरवरून खंडणीसाठी कॉल करत असल्याने मोबाइल टॉवरचा डंप डेटा पोलिसांनी काढला. टॉवरच्या रेंजमध्ये एका ठराविक वेळेत किती मोबाइल फोन सक्रिय होते आणि फोन कॉल्स, मेसेजेस सुरू होते, याची संपूर्ण यादी मिळवली. या यादीत आरोपींचे दोन मोबाइल सतत गव्हाणे पाटील यांच्याजवळ असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी लोकेशन ट्रॅक आरोपींना पकडले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरी 93 एकर शेती, एक कोटी खंडणी द्यायला तयार, तरी असंख्य वार करत घाटात फेकलं, संभाजीनगरमध्ये भयंकर हत्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल