TRENDING:

Jalna Maratha Andolan : फडणवीसांचा जारंगे-पाटलांना फोन, मुख्यमंत्र्यांचं चर्चेचं आमंत्रण, मराठा आंदोलनाची कोंडी फुटणार?

Last Updated:

जालन्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जारंगे पाटील यांना फोन केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 3 सप्टेंबर : जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. या लाठीचार्जच्या विरोधात मराठा संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. काही भागांमध्ये आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. बस आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली तसंच बसच्या काचाही फोडण्यात आल्या.
देवेंद्र फडणवीस यांचा जारंगे पाटलांना फोन, मराठा आंदोलनाची कोंडी फुटणार?
देवेंद्र फडणवीस यांचा जारंगे पाटलांना फोन, मराठा आंदोलनाची कोंडी फुटणार?
advertisement

महाराष्ट्रभर सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान सरकारकडून पावलं उचलायला सुरूवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जारंगे-पाटलांना फोन केला आहे, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चर्चा करण्यासंबंधी निवेदन दिलं होतं.

जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांनी लाठीचार्ज टाळायला हवा होता, सरकार कधीच अशा कारवाईचं समर्थन करत नाही आणि करणारही नाही. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. जे गुन्हे चुकीच्या पद्धतीने दाखल केले असतील ते परत घेतले जातील, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

advertisement

चर्चेने प्रश्न सुटत असतात, त्यामुळे तुम्ही चर्चा करायला या, मुख्यमंत्र्यांनी स्वत: निमंत्रण दिलं आहे, चर्चेतून मार्ग काढू, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे उपोषणाला बसलेले मनोज जारंगे-पाटील आणि सरकार यांच्यात चर्चेची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी सरकारकडून गिरीश महाजन जालन्याकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी जाऊन गिरीश महाजन जारंगे-पाटील यांची भेट घेणार आहेत. गिरीश महाजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या फोनवर बोलणं करून देऊन सरकारचा प्रस्तावही सांगणार आहेत, त्यामुळे आंदोलन सुटणार का आणखी लांबणार? यावर थोड्याच वेळात स्पष्टता येणार आहे. तर आंदोलन सोडवणं सरकारच्या हातात आहे, कोणतीही अट मान्य करणार नाही. जीआर हातात पडला की आंदोलन सोडणार, अशी ठाम भूमिका मनोज जारंगे-पाटील यांनी घेतली आहे.

advertisement

अधीक्षक सक्तीच्या रजेवर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी पडतेय? काय उपाय करावा? डॉक्टरांनी सांगितल्या टिप्स
सर्व पहा

लाठीचार्ज प्रकरणी सरकारने पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. यानंतर शैलेश बलकवडे यांना जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून चार्ज देण्यात आला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna Maratha Andolan : फडणवीसांचा जारंगे-पाटलांना फोन, मुख्यमंत्र्यांचं चर्चेचं आमंत्रण, मराठा आंदोलनाची कोंडी फुटणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल