जालना : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे गणेश मूर्तीवर शेवटचा हात कारागीर फिरवत आहेत. सर्वच कारागीर गणपतीच्या आकर्षक मूर्ती घडवत असले तरी जालन्यातील संत्रे कुटुंबाची कहाणी काही वेगळीच आहे. या कुटुंबातील तब्बल चौथी पिढी उच्चशिक्षित असूनही गणेश मूर्ती बनवण्याच्या कामांमध्ये तेवढ्याच तन्मयतेने स्वतःला झोकून देत आहे. जाणून घेऊयात, जालना शहरातील संत्रे कुटुंबाची ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
जालना शहरातील सत्कार कॉम्प्लेक्स भागात राहणारे संत्री कुटुंबीय हे मूळचे अंबड येथील आहे. कृष्णा संत्रे यांच्या पणजोबांपासून गणेश मूर्ती बनवण्याचे काम हे कुटुंब करत आहे. कृष्णा यांचे पणजोबा मातीपासून गणेश मूर्ती बनवायचे. यानंतर त्यांच्या आजोबांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवणे सुरू केले. त्यांच्या वडिलांनी चांगले शिक्षण घेतल्याने त्यांना नोकरी मिळाली. मात्र, तरीदेखील त्यांनी फावल्या वेळेत गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरूच ठेवले.
हरिश्चंद्र संत्रे यांची अंबड येथून भोकरदन येथे बदली झाली. तब्बल 10 वर्ष भोकरदन येथे असतानाही नोकरीतून वेळ मिळेल तसा संत्रे यांनी काळानुरूप आणि तंत्रज्ञानात होत असलेल्या बदनानुरूप मूर्ती बनवण्याचे काम कायम ठेवले. यानंतर त्यांची बदली जालना येथे झाली. जालना येथे आल्यानंतर त्यांच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कामात तंत्रज्ञानाची जोड मिळाली. अगोदर मातीपासून आणि त्यानंतर शाडू मातीपासून बनवण्यात येणाऱ्या मूर्ती पीओपीपासून बनवू लागले.
त्याचबरोबर सुरुवातीला साध्या ब्रशने होणाऱ्या रंगकाम छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन मशीनद्वारे कसे केले जाते हे वडिलांनी शिकून घेतलं. त्याच वेगवेगळे साहित्यदेखील खरेदी केले आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मूर्ती निर्मितीमध्ये केला, असे कृष्णा संत्रे म्हणाले.
'आप्पाचा विषय लय हार्ड', रॅप सोशल मीडियावर तुफान गाजतय रॅप साँग, कोण आहे हा तरुण?
सध्या संत्री कुटुंबातील चौथी पिढी पदवीधर असूनही मूर्ती निर्मितीच्या कामात स्वतःला झोकून देत आहे. संत्रे कुटुंबाकडे सध्या पाच इंचापासून ते 25 फुटांपर्यंतची गणेश मूर्ती तयार केल्या जातात. यामध्ये 50 रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतची मूर्ती संत्रे कुटुंब तयार करते. केवळ मुंबईमध्ये तयार होत असलेल्या फायबर बॅकग्राऊंड असलेल्या मूर्तीदेखील जालना शहरात उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर 20 ते 21 फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी आधी मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथे जाऊन खरेदी कराव्या लागायच्या. मात्र, संत्रे कुटुंबाने तब्बल 25 फुटांपर्यंत गणेश मूर्ती तयार करण्याचे तंत्रज्ञान जालन्यात आणले. त्यामुळे जालन्यासह मराठवाड्यातील गणेश मंडळांची बुऱ्हानपूर येथे होणारी चक्कर टळली आहे.
फक्त 3 एकरातून मिळविले 52 लाखांचं उत्पन्न, सोलापुरातील शेतकऱ्याचे डाळिंब दुबईला रवाना
आमच्याकडे 5 फुटांपासून ते 25 फुटांपर्यंतच्या मूर्ती गोलापांगरी येथे असलेल्या कारखान्यात तयार होतात. तर 5 इंचापासून ते 5 फुटांपर्यंतच्या मुर्ती जालना शहरात होलसेल आणि रिटेल दरात उपलब्ध आहेत. सध्या आमची चौथी पिढी या क्षेत्रात कार्यरत असून आमची पाचवी पिढी म्हणजे आमची मुलेदेखील आम्हाला रंगकाम आणि इतर कामांमध्ये मदत करतात, असे कृष्णा संत्रे यांनी सांगितले.