मुलाच्या लग्नाच्या संदर्भात नातेवाइकांना भेटून गावाकडे परतत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना लोणार-तळणी-मंठा या दिंडी महामार्गावर शनिवारी रात्री 9 वाजता घडली. गजानन लोकडीबा कांगणे (46) आणि रुक्मिणी गजानन कांगणे (40, वाघाळा, ता. मंठा) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. याच मार्गावर रात्रीच्या सुमारास अजून एका दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला.
advertisement
Pune News:पुणेकरांनो बस चालक मोबाईल वापरताना दिसला तर लगेच सांगा; पीएमपीच्या बस चालकाचं थेट निलंबन
मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मयत दाम्पत्य शिरपूर आणि वडगाव येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्या मुलाचे काही दिवसांत लग्न होणार होते. नातेवाईकांना भेटून हे पती-पत्नी गावाकडे येत होते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. अनेकांचे बळी जात आहेत.
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
याच मार्गावर दुचाकी (एमएच 21 बीसी 3897) वरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा याच रात्री मृत्यू झाला. तरुण लोणारहून तळणीकडे येत होता. परंतु, रात्रीच्या त्याच्या दुचाकीलाही धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. रविराज जीवन खेरमोडे (26, तळणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
एकाच चितेवर पती-पत्नीला मुखाग्नी
अपघातात मृत झालेल्या पती-पत्नीवर वाघाळा येथे एकाच चितेवर मुखाग्नी देण्यात आला. अंत्यसंस्कार होताना नातेवाइकांनी एकच आक्रोश व्यक्त केला आहे.






