TRENDING:

बैलपोळ्याचा सण, याठिकाणी भरतो जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार, साज खरेदीसाठी मोठी गर्दी, VIDEO

Last Updated:

या ठिकाणी विक्रेत्यांनी बैलांच्या साधासाठी लागलेल्या सगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. जिल्हाभरातील शेतकरी या ठिकाणी येऊन बैलांसाठी साज खरेदी करत आहेत. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना : श्रावण महिन्यात हिंदू धर्मातील अनेक सण उत्सव येतात. त्यापैकीच एक म्हणजे बैलपोळा हा बळीराजासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा सण आहे. शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बैलाला विविध रंगी साजणी सजवून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो.

जालना शहरातील सिंधी बाजारातही बैलांच्या साज विक्रीचा मोठा बाजार भरला आहे. या ठिकाणी विक्रेत्यांनी बैलांच्या साधासाठी लागलेल्या सगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. जिल्हाभरातील शेतकरी या ठिकाणी येऊन बैलांसाठी साज खरेदी करत आहेत. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.

advertisement

येत्या 2 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा बैलपोळा हा सण आहे. बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये नेहमी स्पर्धा असते. सर्वात जास्त साज कोणत्या बैलावर चढवला जातो आणि कोणाची बैल जोडी सर्वाधिक आकर्षक दिसते याची उत्सुकता ही सगळ्यांना असते. त्यामुळेच जास्तीत जास्त बैलांचा साज करून बैलांना आकर्षक आणि सुशोभित करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा असतो.

advertisement

Ganeshotsav Nashik : नाशिकच्या बाजारात दाखल झाली लाल मातीची मूर्ती, दरही परवडणारे, फायदेही आहेत अनेक

हाच साज खरेदी करण्यासाठी जालना शहरातील सिंधी बाजारात मोठा बाजार दरवर्षी भरतो. या ठिकाणी बैलांच्या साधासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध असतात. यामध्ये कासरा, सर, बेसन, पैंजण, झूल, बैलांच्या शिंगांना लावायचा हिंगूळ, गाव दोरा, फुगे, रंगेबिरंगी गोंडे, गळ्यातील कवड्याच्या माळा, इत्यादी साहित्य या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहे.

advertisement

मराठवाडा, विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस, मुंबई पुण्यात अशी राहणार परिस्थिती, VIDEO

हा जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार आहे. याठिकाणी किफायतशीर दरात वस्तू मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा सिंधी बाजार येथे भरणाऱ्या बाजारातून वस्तू नेण्याकडे असतो. व्यापारी ही मोठ्या प्रमाणात साज खरेदी करून या ठिकाणी विक्रीसाठी दुकान लावतात. त्यामुळे या बाजारातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. मात्र, यंदा पाऊस पाणी ठीक असूनही शेतकऱ्यांकडून फारसा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे व्यापारी गजानन पातरखळे यांनी सांगितले.

advertisement

बैलपोळा सण जवळ आल्याने इथं आम्ही बैलाचा साज खरेदीसाठी आलो आहोत. इथे चांगल्या दरामध्ये बैलांच्या साधासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू मिळत आहेत. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा असल्याने हा सलामी मोठा उत्साहात साजरा करतो. मी आत्ता बैलांसाठी मोरख्या आणि कासरे इत्यादी साहित्य खरेदी केला आहे. आणखी गोंडे आणि झुला मला खरेदी करायचे आहेत. बाजारात बऱ्यापैकी शेतकऱ्यांची गर्दी आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी राहुल तौर यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
बैलपोळ्याचा सण, याठिकाणी भरतो जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार, साज खरेदीसाठी मोठी गर्दी, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल